कोरोना आला अन् नवी गाडी खरेदीचा मुहूर्त टळला...

लुमाकांत नलवडे
बुधवार, 25 मार्च 2020

दोन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी : 15 एप्रिलनंतर डिलिव्हरी

कोल्हापूर -  साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला आज जिल्ह्यात एक ही नवीन वाहन खरेदी करणे शक्य झाले नाही. जिल्ह्यातील सर्व ऑटोमोबाईल्स शोरूम बंद ठेवण्यात आल्यामुळे हा फटका बसला आहे. कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी अशक्य झाली.
कोल्हापूरकर हौशी म्हणून ओळखले जातात देशात येणार्या नव्या वाहनाची खरेदी करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. केवळ फॅन्सी क्रमांक मिळण्यासाठीही अनेकांनी वाहने बदललेले याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र कोल्हापूरकरांना संचार बंदीचा फटका आहे.  

वाचा - नको पुन्हा गत वर्ष... ना महापूर ना कोरोना...

जिल्ह्यातील सुमारे 50 हून अधिक ऑटोमोबाईल्स शोरूम आज बंद राहिली. पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी ग्राहकांनी केली आहे. मात्र शोरूमस बंद असल्यामुळे साडेतीन मुहूर्त साधने ग्राहकांना अशक्य झाले. जोपर्यंत संचारबंदी उठत संचारबंदी उठत नाही तोपर्यंत ही वाहने शोरूममध्ये ठेवण्याचा निर्णय काही ग्राहकांनी घेतला आहे. केवळ वाहनांच्या खरेदी विक्रीतून पाडव्याची उलाढाल अनेक कोटीत आहे. कोरोना विषाणूचा परिणाम थेट ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला सुद्धा बसला आहे.
 

केवळ आमच्या शोरूम मध्ये सुमारे साडेतीनशेहून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे आहे, मात्र संचारबंदी मुळे शोरूम बंद ठेवले आहे. बुकिंग झालेल्या वाहनांची डिलिव्हरी15 एप्रिल नंतरच केली जाणार आहे.

- नितीन गायकवाड, सेल्स मॅनेजर - युनिक ऑटोमोबाईल

नवीन दुचाकी आज घरी आणण्याचा आनंद वेगळाच होता. मात्र संचारबंदी आणि शोरूम बंद असल्यामुळे ही दुचाकी 15 एप्रिल नंतर घरी आणणार आहे.

- रणजित कदम, ग्राहक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All automobiles showroom closed in the kolhapur district

टॅग्स
टॉपिकस