नको पुन्हा गत वर्ष... ना महापूर ना कोरोना...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाच्या संकटाला कोल्हापूरकरांनाही सामोरे जावे लागते आहे. या पार्श्‍वभूमीवर आज गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा होत आहे.

कोल्हापूर - यंदाच्या महापुराच्या आठवणी मनातून पुसतात न पुसतात तोच आता कोरोनाच्या संकटाला कोल्हापूरकरांनाही सामोरे जावे लागते आहे. या पार्श्‍वभूमीवर आज गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा होत आहे. मात्र, शुभेच्छा आणि दारातील रांगोळीच्या माध्यमातूनही कोल्हापूरकरांनी कोरोनामुक्तीच्या संकल्पाची गुढी उभारली.

वाचा - कोई भी रोड पे ना आए... ही तर आपल्या कोल्हापुरी भावाची कन्सेप्ट....  

रविवारच्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी मध्यरात्रीपासून राज्यात तर काल मध्यरात्रीपासून देशात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे काल रात्रीपासूनच नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र आज पहाटेपासूनच घरोघरी गुढी उभारण्याची तयारी सुरू झाली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या. यानिमित्ताने दारात रांगोळ्या सजल्या. 'नको पुन्हा गत वर्ष ना महापूर ना कोरोना. नवीन वर्ष घेऊन येऊ दे आरोग्य आणि समृद्धी' अशी प्रार्थनाही त्यातून करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gudipawda celebration in kolhapur