
१९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे ऑल इंडियाला पदक पटकावत त्यांनी हॅट्रीक साधली होती.
कोल्हापूर : जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष व ऑल इंडिया चँपियन पैलवान नामदेव दत्तू पाटील महेकर (वय,७५)यांचे आज दु:खद निधन झाले.अचानक त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील कुस्तीशौकींना मधुन हळहळ व्यक्त होत आहे.
१९६७ साली त्यांनी कोल्हापुरातील मठ तालमीतुन कुस्तीच्या सरावाला सुरवात केली.अल्पावधितच ते नावारुपाला आले.सन १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे ऑल इंडियाला पदक पटकावत त्यांनी हॅट्रीक साधली होती.उत्तरेचा तगडा मल्ल कर्तारसिंगशी तगडी लढत गाजली होती.शाहू कॉलेजचे ते माजी विद्यार्थी होते.नव्या मल्लांना ते कायम मार्गदर्शन करत.तसेच जिल्हा तालीम संघाचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणुन ते काम पाहत होते.
हेही वाचा- राणी चन्नम्मा एक्स्प्रेस 7 पासून रुळावर ; मिरज ते बंगळूर दरम्यान धावणार -
संपादन- अर्चना बनगे