हॉटेल्स, परमिट रूम खुली करण्यास परवानगी द्या... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही हॉटेल्स तसेच परमिट रूमला परवानगी द्यावी. 

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही हॉटेल्स तसेच परमिट रूमला परवानगी द्यावी. अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने आज गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांच्याकडे आज केली. दुकानांच्या वेळाही वाढवून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. यासंबंधीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे देसाई यांनी सांगितले. 

शासकीय विश्रामधाम येथे सायंकाळी देसाई यांचे आगमन झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमूख संजय पवार व विजय देवणे यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर चेंबरच्या शिष्ठमंडळाने देसाई यांची भेट घेतली. केंद्र सरकारने आठ जुलैपासून हॉटेल्स तसेच परमिट रुम खूली करण्यास परवानगी दिली आहे. त्या धर्तीवर अटी व शर्ती घालून कोल्हापुरातही परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने, दिलीप मोहिते, ऍड. इंद्रजित चव्हाण यांचा समावेश होता. दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेतही वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली. 

बनावट मद्य, कारवाई करू 
जिल्ह्यात गोवा बनावटीच्या मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. बनावट मद्याची परराज्यातून आयात होऊ नये यासाठी कोणती कारवाई करणार असा प्रश्‍न वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विचारला असता शंभुराजे देसाई यांनी बनावट मद्याची तस्करी करणाऱ्यांवर निश्‍चितपणे कारवाई करू असे आश्‍वास दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow hotels, permit rooms to open ...