पोलिसांबरोबरच गाडीवरील कॅमेऱ्याचाही राहणार वॉच, कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांचा प्रयोग

Along with the police, there will also be a camera watch
Along with the police, there will also be a camera watch

कोल्हापूर ः तुमच्या हालचाली थेट पोलिसांच्या गाडीवरील सीसी कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. एवढंच नव्हे तर गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेही चित्रीकरण "सीसी कॅमेऱ्यात कैद होणार आहे. मोर्चावेळी अशी पोलिस गाडी तुमच्या सोबत असताना तुम्ही हुल्लडबाजी केली तरीही थेट तुम्ही पोलिसांच्या ताब्यात जाऊ शकता. मोबाईलच्या एका क्‍लिकवर, लिंकवर तुमच्या हालचाली जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा पाहता येणार आहे. पोलिस आणि गाडीवरील कॅमेरेही आता गुन्हेगारांवर वॉच ठेवणार आहेत. 
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव नेहमीच या ना त्या पद्धतीचे वेगळपण शोधत असतात. यातूनच त्यांनी त्यांच्या पोलिस जीपवर सीसी कॅमेरे बसविले आहेत. त्याचे नियंत्रण त्यांनी केवळ मोबाईल हॅण्डसेटच्या एका सीमकार्डवर ठेवले आहे. ज्या वेळी पोलिसांची ही जीपगाडी गस्तीवर असते तेंव्हा ती नेमकी कोठे आहे, ज्या परिसरात आहे तेथील सर्व माहिती मोबाईल हॅण्डसेटवर दिसते. एखाद्या मोर्चावेळी ते या चित्रीकरणाची लिंक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देऊ शकतात. त्यामुळे तेही थेट मोर्चाचे चित्रीकरण त्यांच्या हॅण्डसेटवर पाहू शकतात. ही लिंक ते ज्यांना देतील त्यांना सर्व अपडेट चित्रीकरणाद्वारे मिळू शकते. पोलिस जीपवरच कोणी हल्ला चढविला तर त्यांचेही चित्रीकरण तातडीने सीसी कॅमेऱ्यात होते. आजपर्यंत पोलिसांच्या गाडीवर दिवा असायचा काही मोजक्‍याच गाड्यांवर स्पिकर असायचा, पण निरीक्षक जाधव यांनी पोलिसांच्या दृष्टीने तपास कसा करता येईल, नेटवर्क कसे वाढविता येईल, यासाठी केलेला हा प्रयोग नक्कीच पथदर्शी आहे. 

फायदे 
गस्त घालताना संशयित गुन्हेगारांची माहिती मिळू शकते. 
गस्त होते की नाही, गस्तीवेळी परिसरातील परस्थितीचे रेकॉर्डिंग होते. 
लिंकद्वारे एकाच वेळी घटनास्थळाची अनेकांना माहिती मिळते. 
केवळ दहा-पंधरा हजार रुपये खर्चात युनिट बसवणे शक्‍य आहे. 


पोलिस जीपवर असलेल्या सीसी कॅमेऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी केवळ एक सीमकार्डचा वापर केला आहे. मोबाईलच्या माध्यमातून हे कॅमेरे नियंत्रित होऊ शकतात. तसेच गस्तीवरील अपडेट माहिती मोबाईलवर पाहता येते. एकाच वेळी घटनास्थाळाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोणालाही पाहता येते. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. पोलिस आणि गुन्हेगार, चोरट्यापर्यंत पोचण्याची नवी यंत्रणा लवकरच कार्यान्वित करणार आहे. 
-प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे

संपादन ः यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com