भाविकांसाठी खुशखबर ; अंबाबाई, जोतिबा दर्शनाची वेळ वाढवली

ambabai and jyotiba temple time duration increased for opening in kolhapur
ambabai and jyotiba temple time duration increased for opening in kolhapur
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या भाविकांना आता सकाळी सात ते रात्री आठपर्यंत मंदिरात जावून दर्शन घेता येणार आहे. याबाबतचा निर्णय आज पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी उद्या (मंगळवार) पासून होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज दिली. 

शासनाने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देवस्थान समितीने अंबाबाई, जोतिबा मंदिरासह अखत्यारितील सर्व मंदिरे सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी चार ते सात भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय सुरवातीला घेतला. त्यानंतर सकाळी सात ते दुपारी दोन आणि सायंकाळी चार ते रात्री आठ अशी वेळ वाढवली. आता ही वेळ पुन्हा वाढवण्यात आली असून सकाळी सात ते रात्री आठपर्यंत भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. 

पर्यटक आणि भाविकांची संख्या गेल्या महिनाभर वाढली असून अनेक भाविकांना कळसाचे दर्शन घेवून परतावे लागले. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यावर समितीने भर दिला आहे. प्रत्येक भाविकाला सॅनिटायझेशन, थर्मल टेस्टींगनंतरच मंदिरात प्रवेश दिला जातो आहे. दरम्यान, नवीन वर्षात फक्त मुखदर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. 


संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com