अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे वावडे...

Annabhau birth centenary 1 August  this year but only 2 Literature publication
Annabhau birth centenary 1 August this year but only 2 Literature publication
Updated on

कोल्हापूर : समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये कार्याद्वारे आणि साहित्यातून समाजात रुजविणारे अण्णा भाऊ साठे यांच्या वाट्याला जशी उपेक्षा आली, त्याप्रमाणे त्यांचे साहित्यही उपेक्षित राहिले. अण्णा भाऊंच्या विपुल साहित्यांपैकी केवळ कादंबरीवर दोन खंड प्रकाशित झाले आहेत. तेही आता
उपलब्ध नाहीत. साहित्य प्रकाशन करण्यासाठी समितीच सध्या अस्तित्वात नाही. अण्णा भाऊंचे जन्मशताब्दीची सांगता यंदा १ ऑगस्टला होत आहे. 


साहित्य प्रकाशित करण्याबाबत मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य सरकारतर्फे प्रकाशित करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात २०१४ मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन झाली. सदस्य सचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार व समिती सदस्यांनी अनेक अडचणींवर मात करीत अण्णा भाऊंच्या कादंबरीवर दोन खंड प्रकाशित केले.

अण्णा भाऊ साठे गौरव ग्रंथासह इतर साहित्यप्रकारांवर स्वतंत्र खंड प्रकाशित करण्याचा संकल्पही या समितीने सोडला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या युती सरकारने या समितीला मुदतवाढ न देता नवीन समिती स्थापन केली. या समितीने खंड तीन आणि चार प्रकाशित करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याची दखलच घेतली नाही, असे समितीचे सदस्य शिवाजी कांबळे यांनी सांगितले.


खंडनिर्मितीचे काम ठप्प 
कादंबरीवरील दोन खंडही संपले आहेत. ते पुन्हा मुद्रित केले गेले नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर ही समिती बरखास्त करण्यात आली. नवीन समिती स्थापन केली नसल्याने खंडनिर्मितीचे काम पूर्णपणे ठप्प आहे. अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्षही संपत आले, तरी त्यांच्या साहित्यावरील खंड प्रकाशित करण्याबाबत उदासीनता दाखविली जात असल्याने अभ्यासकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

रकारने नवी समिती स्थापन करून अण्णा भाऊंच्या साहित्यावरील खंड प्रकाशित करावेत, यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. आम्ही विनामोबदला काम करण्यास तयार आहोत; पण सरकारने साहित्य प्रकाशित करावे 
- शिवाजी कांबळे, प्रकाशन समिती माजी सदस्य, नांदेड

स्वातंत्र्य चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ, संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती तसेच हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील अण्णा भाऊंचे योगदान मोलाचे आहे. सरकारने साहित्यातून त्यावर प्रकाश टाकावा आणि सीमाप्रश्‍नही 
मार्गी लावावा.
- प्रा. डॉ. शरद गायकवाड,  अभ्यासक, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com