संध्याकाळी पून्हा एकदा झटका : कोल्हापूरमध्ये आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोल्हापुरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा 23   पॉझिटिव्ह रुग्ण  सापडले आहेत.

कोल्हापूर : कोल्हापुरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा 23   पॉझिटिव्ह रुग्ण  सापडले आहेत. त्यामुळेआज दिवसभरात रुग्णांची संख्या 33 तर एकूण जिल्ह्यात  261 रुग्ण पॉजिटीव्ह झाले आहेत. हे सर्व रुग्न विलगीकरण कक्षात असल्यामुळे संसर्गाचा धोका कमी आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा- साडेसहाशे कोटी देणार होतो पण...

जिल्ह्यात ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग धास्तावला आहे विशेषता पुणे-मुंबई या ठिकाणाहून येणारे अनेक कामगार पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठी चिंता लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 23 corona positive in Kolhapur