आयपीएल बेटींग प्रकरणी आणखी एकाला अटक ; रॅकेटची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

एका संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली

कोल्हापूर- तावडे हॉटेल येतील तनवाणी हॉटेलमध्ये आयपीएलच्या सामन्यावर जुगार (बेटींग) प्रकरणी सांगलीतील आणखी एका संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सनी ऊर्फ मिलींद धनेश शेटे (वय 26, रा. सांगली) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आयपीएल क्रिकेट मॅचवर तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या बेटींगवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 18 ऑक्‍टोबरला छापा टाकला होता. बेटिंगप्रकरणी संशयित उमेश शिंदे (वय 39, रा. सांगली) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून 36 हजाराहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

हे पण वाचामी लाईट बिल भरणार नाही; तुम्हीपण भरू नका  

या प्रकरणातील त्याचा साथिदार संशयित सनी ऊर्फ मिलिंद शेटे याला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले कर्मचारी सागर कांडगावे शाहूपुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, कर्मचारी प्रशांत घोलप यांच्या पथकाने ताब्यात घेतले. यामागे रॅकेट असण्याची शक्‍यता असल्याने या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

हे पण वाचाजोतिबाच्या दर्शनासाठी गृहराज्यमंत्री आले  पण मंदिराच्या दारातूनच परत गेले  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another arrested in IPL betting case