ब्रेकिंग - कोल्हापुरात सापडला कोरोनाचा दुसरा रूग्ण

 सुनील पाटील 
Sunday, 29 March 2020

भक्ती पूजा नगर मधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच्या सर्व कुटुंबीयांची तपासणी केली होती.

कोल्हापूर - मंगळवार पेठेतील भक्ती पूजा नगरमधील पूर्वी आढळलेल्या कोरोना रूग्णाच्या बहिणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. या बातमीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबीला दुजोरा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी (ता. 26) भक्ती पूजा नगर मधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच्या सर्व कुटुंबीयांची तपासणी केली होती. या तपासणीचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यात इतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र त्याच्या बहिणीचा अहवाल पॉझिटिव आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त राबवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another Corona patient found in Kolhapur