इचलकरंजी नगरपालिकेच्या 35 कर्मचाऱ्यांच्या तपासणीनंतर पुढे आली ही बाब

Antibody test by health department of the municipality and DKTE Covid Care Center ichalkaranji
Antibody test by health department of the municipality and DKTE Covid Care Center ichalkaranji
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांच्या रक्तातील ऍन्टी बॉडी तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेकांना कोरोना होवून गेल्याचे निदान झाले आहे. 90 पालिका कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 35 कर्मचाऱ्यांच्या रक्तात ऍन्टी बॉडी तयार झाल्याचे तपासणीतून दिसून आले आहे. 81 पोलीस कर्मचाऱ्यांच्या तपासणीमध्ये 7 जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी आढळून आले आहेत. 


पालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने व डीकेटीई कोविड केअर सेंटरच्यावतीने ही तपासणी करण्यात आली. सुरुवातीला पालिकेच्या कार्यालयीन विभागात काम करणाऱ्या 51 जणांच्या रक्ताची तपासणी केली. त्यापैकी 16 जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी आढळल्या आहेत. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली. यामध्ये 39 जणांच्या तपासणीत 19 जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी तयार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांना कोरोना संसर्ग होवून गेल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 

अनेकांना कोरोना संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट 
कोरोना योद्धा म्हणून सुरवातीपासून आघाडीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या रक्ताची आज तपासणी केली. शिवाजीनगर, गावभाग, शहापूर व शहर वाहतूक शाखा अशा सर्वच ठिकाणच्या एकूण 81 पोलिस कर्मचाऱ्यांच्या रक्ताची तपासणी केली. त्यामध्ये सात जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी आढळून आल्यामुळे अनेक पोलिसांना कोरोना होवून गेल्याचे समोर आले आहे. शहरात कोरोनाचा कहर सुरुच असून दोन हजारच्यापुढे कोरोना रुग्ण शहरात आढळून आले आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या शतकाच्या पुढे गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ऍन्टी बॉडी तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर ही मोहिम राबविण्यात आली आहे. 


आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य विभाग, डिकेटीई कोविड केअर सेंटरकडील डॉ.मिरजे, डॉ.ढाले तसेच प्रयोग शाळा तंत्रज्ञ वर्ग यामध्ये सहभागी झाला आहे. यापुढेही विविध स्तरातील नागरिकांची ऍन्टी बॉडी तपासणी केली जाणार आहे. यावरुन शहरात कोरोना संसर्गाची टक्केवारी समजण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार रक्तातील ऍन्टी बॉडी तपासणी मोहिम सुरु केली आहे. पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. आता आरोग्य सेवकांची तपासणी केली जाणार आहे. 
-डॉ. सुनिलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी  

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com