हाय व्होलटेज ड्रामा ; आम्ही तयार, तुमचे काय ? राजू शेट्टींना घेरण्याची विरोधकांची खेळी

article on gram panchayat election for udgaon jaysingpur by ganesh shinde in kolhapur
article on gram panchayat election for udgaon jaysingpur by ganesh shinde in kolhapur
Updated on

जयसिंगपूर (कोल्हापूर) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांचा राजकीय कस लागणाऱ्या उदगाव (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार बनण्याची चिन्हे आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा डांगोरा पिटला जात असताना उदगाव येथे मात्र स्वाभिमानीविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शड्डू ठोकला आहे. दहा वर्षाची सत्ता उधळून लावण्याचे विरोधकांचे मनसुबे शेट्टी कसे उधळून लावतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. 

शेट्टी यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उदगावमधून प्रारंभ झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही येथूनच आकार मिळत गेला. यामुळे ग्रामपंचायतीवरही स्वाभिमानीचेच प्राबल्य राहिले. महाविकास आघाडीतील घटक असणाऱ्या स्वाभिमानीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने मोट बांधली आहे.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती स्वाती सासणे आदींनी सत्ता काबीज करण्यासाठी आघाडी केली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गावात स्वाभिमानीची सत्ता आहे. शिरोळ तालुक्‍यातील एक मोठी ग्रामपंचायत अशीही ओळख आहे. 
या निवडणुकीत शेट्टींसह राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची प्रतिष्ठा 
पणाला लागली आहे.  

आम्ही तयार; तुमचे काय? 

राज्यात महाविकास आघाडी असताना उदगावमध्ये मात्र आघाडीत बिघाडी झाली आहे. गाव पातळीवर बिनविरोधच्या प्रयत्नांची साधी चर्चा होताना दिसत नाही. आम्ही एक व्हायला कधीही तयार आहे, तुमचे सांगा असे जाहीरपणे सांगण्यात येत असले तरी एकत्र येण्यासाठी समोरासमोर चर्चा मात्र होताना 
दिसत नाही. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com