खुन्नस धरुनच त्याचा केला घात ; सूत्रधारासह दोघे पसार

 assassination case  in ichlkarnji kolhapur marathi news
assassination case in ichlkarnji kolhapur marathi news

इचलकरंजी (कोल्हापूर) :  येथे गुरुवारी रात्री झालेल्या किशोर सुरेश नेटके (वय ३३, साईट नं. १०२) याच्या खून प्रकरणी पोलिसांनी आज चौघांना अटक केली. मुख्य सूत्रधारासह दोघेजण मोटारीतून कर्नाटकात पसार झाले. 

अल्पवयीन मुलगा बेपत्ता प्रकरणातील संशयित महिलेचे नाव पोलिसांना कळविल्याचा रागातून खून केल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. मुख्य सूत्रधार बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासह तौफक पसार झाला आहे. चार सीसीटीव्ही फुटेजमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.

त्यामुळे.. कुटुंबीयांवर तो चिडून  होता

मृत किशोर याची आई मंगल सुरेश नेटके याच्या तक्रारीनुसार सहा जणांवर गुन्हा नोंद केला. त्यापैकी खंडू विलास कुरणे (वय ४०, लालनगर), तन्मय रमेश गुरव (२५), समाधान साधू नेटके व टिल्या उर्फ जमीर अल्लाबक्ष शेख (तिघेही साईट नंबर १०२, आसरानगर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
मृत किशोरचा अल्पवयीन पुतण्या दयानंद बेपत्ता झाला आहे. याबाबतची तक्रार गावभाग पोलिसांत नोंद आहे. त्याला खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बच्चन कांबळे याच्या पत्नीने पळवून नेल्याचा संशय मृत किशोरच्या कुटुंबीयांना होता. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली होती.

त्यामुळे बच्चन कांबळे किशोर व त्याच्या कुटुंबीयांवर चिडून होता. त्याशिवाय पुतणीच्या प्रेमविवाहातूनही वाद निर्माण झाला होता.दरम्यान, मृत किशोर व बच्चन यांनी या वादातूनच मंगळवारी खुन्नस दिली. त्यामुळे कट रचून संशयितांनी किशोरचा मोटारीतून पाठलाग करून त्याच्या दुचाकीला धडक देवून नंतर हत्याराने वार केले. सीसीटीव्हीच्या आधारे मुख्य सूत्रधार बच्चन याच्यासह संशयित मोटारीतून कर्नाटकात गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आणखी काही संशयित वाढण्याची शक्‍यता आहे.

संशयिताची दुचाकी पेटवली
खुनातील मुख्य सुत्रधार बच्चन कांबळे याची घराजवळ लावलेली दुचाकी आज सकाळी संतप्त नागरिकांनी पेटवली. त्यामुळे साईट नं.१०२ मध्ये तणाव निर्माण झाला होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त तैनात आहे.

मृतदेह घेण्यास नकार
मृत किशोर याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. संशयितांना पकडल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर आज दुपारी अंत्यसंस्कार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com