इचलकरंजीत पालिकेसमोर पेटवून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यु

ऋषिकेश राऊत
Monday, 26 October 2020

पालिकेच्या मागील पार्किंग रस्त्याने प्रवेश करून त्यांनी आत्मदाहनाचा प्रयत्न केला.

इचलकरंजी : सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगरपालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. पालिकेच्या मागील पार्किंग रस्त्याने प्रवेश करून त्यांनी आत्मदाहनाचा प्रयत्न केला. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने सांगलीतील सीवील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - कोल्हापूर जिल्हा परिषदेतून आरोग्याचे कोवीड योध्दा पुरस्कार वादात ; वशिलेबाजी झाल्याचा आरोप -

इचलकरंजी नगरपालिकेच्या इतिहासात पाहिल्यांदा आत्मदहनाची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी पत्रकार बैठकीत घेऊन भोरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेल्याबद्दल भोरे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र पाठपुरावा करूनही याबाबत पालिकेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

हेही वाचा -  मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का ? नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

भोरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त होता. मात्र भोरे यांनी पालिकेच्या मागील प्रवेशद्वारामधून प्रवेश करत स्वतःला पेटवून घेतले. त्वरित पोलिसांनी धाव घेऊन अग्निरोधक वापरून आग आटोक्यात आणली. भोरे यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र भाजण्याचे प्रमाण अधिक असल्यने त्यांना सांगलीतील सीवील रुग्णालयात उपचारासाठी हलविले असताना त्यांचा मृत्यू झाला.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attain suicide a social reformer mr. naresh bhore in ichalkaranji in kolhapur