देशी, परदेशी श्‍वानांनी वेधले लक्ष 

Attention attracted by native, exotic dogs
Attention attracted by native, exotic dogs

कोल्हापूर : मोठ्या कानाचे, अंगभर केसाळलेले, बुटके अशा विविध शरीरयष्टीच्या देशी विदेशी श्‍वानांनी आज येथे सर्वांचे लक्ष वेधले. तिबेटियन मस्टीप, सायबेरियन हास्की, चावचाव, बिगल हाऊंड व पग जातीच्या श्‍वानांभोवती प्रेक्षकांची गर्दी राहिली. कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरतर्फे त्याचे आयोजन केले.

लोणार वसाहतीमधील रामकृष्ण हॉलमध्ये झालेल्या डॉग-शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देशभरातील पस्तीसहून अधिक जातीचे तीनशेहून अधिक श्‍वानांचा स्पर्धेत सहभाग राहिला. 

मुंबई, बंगळूर, हैदराबाद, मुंबई, गोवामधील स्पर्धक आपापले श्‍वान घेऊन सकाळीच रामकृष्ण हॉलच्या परिसरात पोचले होते. श्‍वानांची मोबाईलवर छायाचित्रे टिपण्यासाठी प्रेक्षकांची लगबग पाहायला मिळाली. हॉलच्या परिसरात श्‍वानांना ठेवले होते. स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांनी स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी केली. श्‍वानांना घेऊन त्यांचे प्रशिक्षक लॉनवर येत होते. श्‍वानांची शरीरयष्टी, कान, चाल, हावभाव यांचे परीक्षण करण्यात येत होते. त्यानुसार त्यांना गुण देण्यात येत होते. अकरा ग्रुपमध्ये स्पर्धा असल्याने दिवसभर श्‍वानांभोवती प्रेक्षक थांबून होते. प्रत्येक श्‍वानाचे वैशिष्ट्य, त्याची किंमत, शहर यांची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत होती. अर्जेंटिनाच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक टेरेसा गॅलो व बेटिना सॅमेरटीनो यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. 

आकर्षक शरीरयष्टी 
तिबेटियन मस्टिप जातीचे श्‍वान दिसायला सिंहासारखे. त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. चावचाव जातीचे श्‍वान केसाळ असल्याने त्याची मोबाईलवर छायाचित्रे घेतली जात होती. सायबेरियन हास्की, बिगल हाऊंड व पग हे श्‍वानही भाव खाऊन गेले. अफगाण हाऊंड, वायर फॉक्‍स टेरियर, बुल डॉग, बेल्जियम शेफर्ड, फ्रेंच बुलडॉग, अकिता, अमेरिकन कॉकर स्पॅनियल, मॅस्टिफ, मिनीएचर पिक्‍चर, सॅमॉईड या दुर्मिळसह डॉबरमॅन, लॅब्रोडोर, बॉक्‍सर, ग्रेट डेन, बिगल, कारवान हाऊंड, रॉट बिलर जातीच्या श्‍वानांनी त्यांच्या शरीरयष्टीने प्रेक्षकांना आकर्षित केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com