शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यावर बंदी, शिक्षण खात्याचा आदेश...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

विद्यार्थ्यांना अभ्यासापासुन काही प्रमाणात विरंगुळा मिळावा आणि इतर भागातील लोकांची संस्कृती, तेथील राहणीमान आदीबाबंत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी याकरीता दरवर्षी शाळांकडुन शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते.

बेळगाव - शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर पुढील आदेश येईतो पर्यंत सर्व प्रकारच्या शैक्षणिक सहल काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही बंदी लागु असणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन
शैक्षणिक बंदी घालण्यात आल्याची माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासापासुन काही प्रमाणात विरंगुळा मिळावा आणि इतर भागातील लोकांची संस्कृती, तेथील राहणीमान आदीबाबंत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी याकरीता दरवर्षी शाळांकडुन शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थीही दरवर्षी शैक्षणिक सहलीची आतुरतेने वाट पहात असतात. मात्र गेल्या वर्षी भारतीय नागरीकत्व दुरुस्ती कायदा लागु झाल्यानंतर देशभरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे शैक्षणिक सहली रद्द करण्याचा आदेश बजावण्यात आला होता त्यामुळे अनेक शाळांना आपल्या नियोजित सहली रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे सहलीसाठी परिवहन मंडळाच्या बसची नोंदणी केलेल्या शाळांना मोठा फटका बसला होता.

वाचा - बेळगाव जिल्हा 36 तास संपूर्ण सीलडाऊन राहणार...

देशभरात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे यावेळी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास मोठा विलंब होणार असला तरी त्यापुर्वीच शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करीत 2020 - 21 च्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यावर बंदी असल्याचे कळविले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाचे संकट लवकर दुर न झाल्यास शैक्षणिक वर्षावर मोठा परीणाम होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याची चिंता वाढली असुन सामाजिक अंतर राखत शाळा सुरु करण्याबाबत विचार केला जात आहे. तरीही शाळा कधी सुरु होणार याबाबत मात्र अनिश्‍चितता कायम असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट दुर झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा सहलींना परवानगी दिली जाणार आहे.
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on organizing educational trips order of education department belgum