महत्वाची बातमी - सॅनिटेशन डोम करण्यास बंदी : आरोग्य विभागाचे आदेश ...

Banning sanitation dome kolhapur marathi news
Banning sanitation dome kolhapur marathi news

कोल्हापूर :कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, शहरांचे प्रवेशदवार तसेच रुग्णालयांमध्ये सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर केला जात आहे. आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनीही ठिकठिकाणी असे डोम उभे करण्यास निधीही दिला आहे. मात्र आता हे डोम उभे करण्यास आरोग्य विभागाने बंदी घातली आहे. या डोमच्या माध्यमातून कोरोनाबाबत काही फायदा होतो, यास कोणताही शास्त्रीय आधार नसून उलट काही वेळा या डोममधून फवारली जाणारी औषधे व्यक्‍तीच्या आरोग्याला अपायकारक ठरतील, अशी भितीही आरोग्य विभागाने व्यक्‍त केली आहे. 

 शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्‍यता
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. शरीरावर कोरोनाचे विषाणु राहू नयेत म्हणून विविध औषधांची फवारणी करण्यात येते. या कामासाठी ठिकठिकाणी सॅनिटेशन डोम उभारले जात आहेत. या टनेलमधून जंतुनाशक रसायनांची फवारणी केली जाते. मात्र त्याचा कोरोना रोखण्यासाठी काही उपयोग होतो, याला मात्र काहीही शास्त्रीय आधार नाही. अनेकवेळा या रसायनांच्या फवारणीचा शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. त्यामुळे असे टनेल उभे न करण्याच्या सुचना राज्याच्या आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे सध्या या टनेलवर होतो असलेला लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे. 

कोणताही शास्त्रीय आधार नाही.

जिल्ह्यात सध्या 5 ते 10 हजार रुपयांपासून 50 हजार आणि 1 लाख रुपयापर्यंतची रक्‍कम असे टनेल उभे करण्यावर खर्च केली जात आहे. तसेच या टनेलमधून सोडियम हायपोक्‍लोराईडची ठराविक मात्रा घेवून त्याचे द्रावण फवारले जाते. यामध्ये बऱ्याच कंपन्या काम करतात. काही ठिकाणी विशिष्ट वासाचा वापर करुन द्रावणाची निर्मिती केली जाते. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या प्रकाराऐवजी घरात ज्यापध्दतीने फरशी पुसली जाते, त्याचपध्दतीने साफसफाई होणे आवश्‍यक आहे.

आरोग्याचे नुकसान होण्याची शक्‍यता

जिल्ह्यात सध्या ग्रामीण भाग असो की शहर, येथे खाजगी व सरकारी निधीतून सॅनिटेशन डोम उभे केले जात आहेत. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्याचा फायदा होण्यापेक्षा आरोग्याचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्याऐवजी घरातील नियमित साफसफाईप्रमाणे स्वच्छता करण्यात यावी. येथून पुढे सॅनिटेशन डोमवर कोणीही पैसे खर्च करु नयेत. -

डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com