पॅरा ऑलिम्पिक खेळाडूंना ‘द ब्रिज’ प्रकल्पाचाच आधार

basis of the Bridge project for Paralympic athletes
basis of the Bridge project for Paralympic athletes
Updated on

कोल्हापूर : सावली केअर सेंटरने पॅरा ऑलिम्पिकसाठी कंबर कसली आहे. त्यांच्या ‘द ब्रिज’ या क्षमता संवर्धन प्रकल्पांतर्गत येत्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या व देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची क्षमता वाढीसाठीची विशेष तयारी सुरू आहे. 


लॉकडाउनमुळे खेळाडूंच्या खेळण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. सरावापासून लांब राहिल्याने मानसिक खच्चीकरण झाले आहे. शारीरिक बदल हे सर्वांत मोठे आव्हानही खेळाडूंसमोर आहेच. यासाठी ‘द ब्रिज’ प्रकल्प वरदान ठरला असून, सध्या येथे पॅरा ऑलिम्पिकसाठी तयारी करणारे स्वरूप उन्हाळकर, अनिल पवार हे आपल्या क्षमतांवर काम करीत आहेत. स्वरूप रायफल शूटिंगचा खेळाडू आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला असून, पॅराऑलिम्पिकमधील सध्याचा राष्ट्रीय रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्याला सातत्याने सराव करणे कठीण होत होते.

यामुळे खेळाडूचे मानसिक खच्चीकरणही सुरू होते. यावर उपाय करीत विविध थेरपीच्या वापराने नव्या उमेदीने स्वरूप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. पवार हे १० मीटर  एअर पिस्टल प्रकारातील शूटिंग खेळाडू आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळाली आहेत. पवार यांची स्वत:ची शूटिंग ॲकॅडमी असून, कोल्हापूरमधील अनेक नामवंत खेळाडू घडविण्यात त्यांचा मोलाचा हात आहे. अनेक महिने सरावापासून दूर राहिल्याने सरावादरम्यान तीव्र वेदनांना सामोरे जावे लागत होते. यामुळे पवार यांनी खेळाडू म्हणून निवृत्त होत फक्त कोच म्हणूनच यापुढे कार्यरत राहण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, ‘द ब्रिज’मध्ये आल्यावर त्यांच्या संपूर्ण विचारांची दिशा बदलण्यात 
यश आले.

येथील खेळाडूंची क्षमता अन्य देशांच्या खेळाडूंहून अधिक आहे. योग्य मार्गदर्शन व उपचार मिळाल्यास खेळाडू अधिक चंगली कामगिरी करून देशाचा लौकिक वाढवू शकतील. यासाठी ‘द ब्रिज’ प्रकल्प मोठा वाटा उचलेल.
- किशोर देशपांडे, संचालक, सावली केअर सेंटर

संपादन- अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com