दुचाकीला टेकून उभा राहिल्याने तरूणास दगडाने मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली. याबाबतची फिर्याद धनंजय दत्तात्रय कोळी (वय 29, रा. कदमवाडी) यांनी दिली. 

कोल्हापूर - दुचाकीला टेकून उभा राहिल्याच्या कारणावरून तरूणास एकाने दगडाने मारहाण केली. हा प्रकार लिंशा हॉटेल चौक परिसरात सायंकाळी घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली. याबाबतची फिर्याद धनंजय दत्तात्रय कोळी (वय 29, रा. कदमवाडी) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, धनंजय कोळी हे कदमवाडी येथे राहतात. ते गुरूवारी (ता.3) सायंकाळी लिशा हॉटेल चौक परिसरातील एटीएमजवळ गेले होते. तेथील एका दुचाकीला ते टेकून उभे राहीले. तेवढ्यात दुचाकी मालक तेथे आला. त्याने "तू माझ्या गाडीला टेकून का उभा राहीलास' असा जाब विचारत मारहाण केली. त्यानंतर दगडाने धनंजय यांच्या डोक्‍यात मारहाण करून धमकी दिली. अशी फिर्याद जखमी धनंजय यांनी दिली. त्यानुसार संबधित मोटारसायकल मालकावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला. 

हे पण वाचा - बांधकाम नियमावली जाहीर ; आता दीड हजार चौरस फुटांपर्यंत परवानगीची कटकट टळणार

  
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating to young boy in kolhapur