esakal | बापरे ; दारू खरेदीसाठी आमच्या परिसरात का आला म्हणत तरूणाला बेदम मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

beating the young man who going to alcohol purchasing in kolhapur

एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्या तरुणांत जुना वाद उफाळून आला. यावरून झालेल्या वादावादीचा प्रकार पुढे मारहाणीपर्यंत  गेला. पोलिसांनी सौम्य लाठीमार हल्ला करीत सर्वांनाच तेथून पांगवले.

बापरे ; दारू खरेदीसाठी आमच्या परिसरात का आला म्हणत तरूणाला बेदम मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर​ : मावा खाताना त्यांच्या परिसरात दम देतो म्हणून आज दारू घेण्यासाठी आपल्या परिसरात आलेल्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. शनिवार पेठेतील एका दारू दुकानासमोर सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रंकाळा वेश परिसरात मावा घेण्यासाठी गेल्यानंतर तेथे हा तरुण महाराणा प्रताप चौक परिसरातील तरुणांना दम देतो. तो आज दारू घेण्यासाठी शनिवार पेठ परिसरातील एका दुकानात आला होता. तेथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्या तरुणांत जुना वाद उफाळून आला. यावरून झालेल्या वादावादीचा प्रकार पुढे मारहाणीपर्यंत  गेला. पोलिसांनी सौम्य लाठीमार हल्ला करीत सर्वांनाच तेथून पांगवले.  याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांमध्ये सुरू आहे.

हे पण वाचा - धक्कादायक : खासदार आमदारांसह अधिकाऱ्यांनीच फासला नियामाला हारताळ

 दरम्यान, मद्य विक्री दुकानामध्येच मद्य पिणाऱ्यांवर आणि दुकानावर कारवाई होणार आहे. तसेच, दुकानांचा परवाना रद्द केला जाणार असल्याच्या सूचनाही श्री पाटील यांनी दिल्या आहेत. 

हे पण वाचा -  कोल्हापुरात तळीरामांची निराशा, दुकानासमोर तोब गर्दी
रिकाम्या हातानेच घरी परतण्याची वेळ


 

अशी होईल मद्य विक्री : 

सीलबंद, दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक असू नये, दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर बंधनकारक,  सहा फूटांवर वर्तुळ आखणे बंधनकारक, संबंधित परवानाधारकाने कामगार, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावे, सर्दी, खोकला व ताप असणाऱ्यांना दुकानात प्रवेश देवू नये, दोन तासांनी दुकान परिसर निर्जंतूकीकरण करणे,  ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात द्यावा, किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये नियम पाळणे बंधनकारक,
 सीलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत राहतील.
 मद्य बाळगणे, खरेदी करण्याच्या क्षमतेचा भंग होवू नये, 
दुकानामध्ये दारू पिल्यास परवाना निलंबित, नियमांचा भंग दुकान बंद करून त्यांच्याविरूध्द कारवाई होणार.

कोल्हापुरातील प्रेत्येक घटना घडामोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

go to top