esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

liquor stores are not open in kolhapur

आज दारूची दुकाने सुरू होणार अशी बातमी असल्यामुळे तळीराम सकाळी दहा वाजल्यापासूनच दारूच्या दुकानासमोर गर्दी करुन उभे होते. लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोल्हापुरात तळीरामांची निराशा, दुकानासमोर तोब गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या 40 दिवसांपासून दारूची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची मोठी पंचाईत झाली होती. राज्य शासनाने चार मेपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी नसल्यामुळे आज दुपारपर्यंत दारूची दुकाने सुरू होऊ शकली नाहीत.

आज दारूची दुकाने सुरू होणार अशी बातमी असल्यामुळे तळीराम सकाळी दहा वाजल्यापासूनच दारूच्या दुकानासमोर गर्दी करुन उभे होते. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पण एक वाजला तरी दुकाने सुरू झाली नसल्याने तळीरामांची निराशा झाली आणि निराश होऊन तळीरामांना घरी परतावे लागले. काही ठिकाणी मात्र, दुकाने सुरू होण्याच्या आशेवर लोक दुकानाबाहेर गर्दी करून उभे होते. 

हे पण वाचा - भाजपाने रडीचा डाव खेळू नये! जयंत पाटलांची भाजपवर खरमरीत टीका 
 

दरम्यान, आज जिल्ह्यातील लाॅकडाऊनमध्ये थोडी शिथीलता दिली आहे. त्यामुळे 40 दिवसानंतर रस्त्यावर वाहने दिसू लागली आहेत. कोल्हापूर जिल्हा ऑरेंज कॅटेगरित गेला आहे. त्यामुळे लोकांनी रसत्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जणू काही कोरोनावर मात केली आहे, अशा अविर्भावात लोक फिरत आहेत, हे योग्य नाही. कोरोनावर अजून लस सापडलेली नाही. त्यामुळे पुढील काही काळ मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंग ठेवणे आदी बाबी कराव्या लागणार आहेत. मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जर लोकांनी विनाकारण फिरणे थांबवले नाहीतर पुन्हा एकदा लॉकडाउन करावे लागेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. 

हे पण वाचा -  कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!
 

कोल्हापुरातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 

go to top