बेळगाव जिल्ह्यात आठवड्यात 'इतक्या' जणांची कोरोनावर मात

 In Belgaum district people overcome corona in a week
In Belgaum district people overcome corona in a week

बेळगाव - कोरोनावर 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान 410 जणांनी मात केली आहे. शिवाय आठवड्यातच घरी जाऊ दिलेल्यांच्या संख्येने 1 हजाराचा आकडा ओलांडला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकड्याने चिंता वाढली आहे. पण, बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यामुळे दिलासा मिळत आहे. 

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडे चार हजार आहे. त्यापैकी सुमारे 1100 रग्ण बरे झाले. यापैकी चारशेहून अधिक रग्ण या आठवड्यात बरे झाल्यामुळे घरी सोडले आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेचे आले आहे. हळूहळू कमी होऊ लागल्याची अनुभूतीही येते आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

तीन हजार जण उपचार घेत आहेत. पण, चिंतेचे बाब म्हणजे कोरोना बळीची संख्या वाढत आहे. 1 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान 91 जण कोरोनामुळे दगाविले आहेत. तर, काहींचा अहवाल प्रतिक्षेत आहे. जिल्ह्यात 410 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात सर्वाधिक 31 जुलैला 138 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापाठोपाठ 2 ऑगस्टला 80 जणांनी कोरोनावर मात केली. या आठवड्यात सर्वात कमी 1 ऑगस्टला 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

           तारीख            कोरोनामुक्त 

  • 31 जुलै              138 
  • 1 ऑगस्ट            31 
  • 2 ऑगस्ट            80 
  • 3 ऑगस्ट            35 
  • 4 ऑगस्ट            30 
  • 5 ऑगस्ट            52 
  • 6 ऑगस्ट            44 


दृष्टीक्षेप 

  • कोरोनाबाधित               4,470 
  • मृत्यू                            91 
  • घरी जाऊ दिलेले            1,219 
  • उपचार घेत असलेले       3,160 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com