बेळगावात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निवारा केंद्रांसाठी 'या' 14 इमारतींचा घेतला ताबा

in belgum buildings were taken over for shelters
in belgum buildings were taken over for shelters

बेळगाव - तीन दिवस बेळगाव शहर व परीसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात निवारा केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील 14 इमारतींचा ताबा गुरूवारी (ता.6) घेण्यात आला आहे. गतवर्षी शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या काळात अनेक कुटुंबे विस्थापित झाली होती. त्यांच्यासाठी याच 14 इमारतींमध्ये निवारा केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. त्याच इमारतींमध्येही यावर्षीही निवारा केंद्रांची सुरूवात केली जाणार आहे. आयुक्त के. एच. जगदीश यानी गुरूवारी (ता.6) यासंदर्भातचा आदेश बजावला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत संबंधित इमारतींचा ताबा घेण्याची सूचना त्यानी दिली आहे. कोरोनामुळे क्वारंटाईनसाठी या इमारतींचा ताबा घेतला जात असल्याचा गैरसमज इमारत मालक व परीसरातील रहिवाशांमध्ये होवू शकतो. त्यामुळे ताबा घेताना इमारत मालक व शेजाऱ्यांना विश्‍वासात घेण्याची सूचना आयुक्तानी दिली आहे. या प्रत्येक इमारतीसाठी व नियोजित निवारा केंद्रांसाठी एक समन्वय अधिकारी आयुक्तानी नियुक्त केला आहे. त्या अधिकाऱ्याकडे संबंधित इमारतीचा ताबा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात बेळगाव शहरात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शहरातील विस्थापित कुटुंबांचे मोठे हाल झाले होते. याशिवाय परराज्यातील व परजिल्ह्यातून बेळगावात आलेल्यांची व येथेच अडकलेल्यांचीही गोची झाली होती. त्यावेळी त्यांना निवारा व भोजन महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावेळी आधी दोनच निवारा केंद्रांची सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतर विस्थापितांची संख्या वाढली व निवारा केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली. तब्बल तीन आठवडे ही निवारा केंद्रे कार्यरत होती. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले होते. चोविस तास त्या ठिकाणी सेवा देण्यात येत होती. त्यामुळे अनेकांना निवारा व दोन वेळचे भोजन मिळाले होते. यंदा अतिवृष्टी झाली नसली तरी महापालिकेने खबरदारी म्हणून निवारा केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी त्यासाटी 14 इमारतींचा ताबा घेण्याची औपचारीकता पूर्ण करण्यात आली आहे. 

या इमारतींमध्ये होणार निवारा केंद्र 

इमारतीचे नाव                                   समनव्य अधिकारी 

जयवंती मंगल कार्यालय खासबाग          बी. व्ही हिरेमठ 
साईभवन, जुना धारवाड रोड                  एच. बी. पीरजादे 
मल्लिकार्जुन देवस्थान चावडी गल्ली      बी. एम. पिसाळे 
जेल शाळा वडगाव                               विठ्ठल व्हनळ्ळी 
कैवल्य योग मंदीर मंडोळी रोड               एस. जी. अंबीगेर 
आदीनाथ भवन अनगोळ                      आनंद होंगल 
आंबेडकर भवन नेहरूनगर                     सचिन कांबळे 
धर्मनाथ भवन रामनगर                        बाबू माळेन्नावर 
सुखशांती भवन उद्यमबाग                  रवी मास्तीहोळीमठ 
अन्नपूर्णेश्‍वरी मंगल कार्यालय येळ्ळूर रोड अशोक गदग 
दैवज्ञ मंगल कार्यालय म. फुले रोड          मंजुनाथ गडाद 
कोनवाळ गल्लीतील विभागीय कार्यालय  रमेश कोणी 
विद्याधिराज भवन रामनगर                  संतोष अनिशेट्टर 
केपीटीसीएल भवन                               गजानन बेनगे

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com