सावधान बनावट सीआयडी पोलिस तुम्हास लुबाडू शकतात

 Beware fake fake CID cops can rob you
Beware fake fake CID cops can rob you
Updated on

कोल्हापूर ः सीआयडी पोलिस असल्याची बतावणीकरून दोघा मोटारसायकलस्वार लुटारूंनी वृद्धाचे सुमारे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. सानेगुरुजी वसाहत येथे आज भरदिवसा हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आनंदराव धोंडीराम साठे (वय 71) हे शिरगावकर कॉलनी सानेगुरुजी वसाहत येथे राहतात. ते आज सकाळी साडेआकराच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेले होते. काही अंतरावर त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून दोघे जण आले. त्यांनी साठे यांना थांबण्यास सांगितले. मोटारसायकलस्वाराने त्यांना "आम्ही सीआयडी पोलिस आहोत' तुम्ही हातात व गळ्यात सोने घालून का फिरता' अशी विचारणा केली. हे दागिने काढा तुम्हाला रूमालात बांधून देतो, असे सांगितले.' त्या दोघांवर विश्‍वास ठेऊन साठे यांनी गळ्यातील सुमारे पावणे तीन तोळ्याची सोन्याची चेन व दोन अंगठ्या असे सुमारे चार तोळ्याचे दागिने काढले.त्या दागिन्यासह खिशातील पाकीटही त्यांना दिले. त्या दोघा लुटारूंनी ते रुमालात बांधल्याचा बहाणा करत हे दागिने हातोहात लांबवले. तसे ते तेथून निघून गेले. दरम्यान साठे यांनी रुमालात बांधलेल्या दागिन्याबाबत खात्री केली. त्यावेळी यांना रुमालात फक्त पाकीट असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला. तसा तातडीने पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला. साठे यांनी सायंकाळी 70 हजाराचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद दिली. 

लुटारूंच्या वर्णनावरून शोध सुरू 
दोघे लुटारून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आले होते. त्यातील चालक अंदाजे 45 वर्षाचा असून अंगाने जाड, नाक सरळ, चेहरा उभट, अंगावर काळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला होता. तसेच दुसरा लुटारू हा अंदाजे 25 ते 30 वर्षाचा असून त्याने अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिस त्या दोघांचा परिसरातील सीसी टीव्हीच्या मदतीने शोध घेत आहेत.

- संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com