पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून भैय्या माने यांनी भरला अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

पुणे पदवीधरची उमेदवारी देऊन शरद पवारसाहेब माझ्या निष्ठेला न्याय देतील

 

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मला देऊन आमचे नेते शरद पवारसाहेब माझ्या निष्ठेला निश्चितच न्याय देतील, असा विश्वास केडीसीसी बँकेचे संचालक व शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने यांनी व्यक्त केला.आज पुणे येथे विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक, सिनेट सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने यांनी  अर्ज भरला.

राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील म्हणाले, देशाचे नेते शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विचारांने काम करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या  माने यांना शरद पवारसाहेब निश्चितच न्याय देतील असा विश्वास आहे.

हेही वाचा- ‘किसान’ योजनेत १९१ बोगस लाभार्थी -

प्रताप उर्फ भैय्या बाबा म्हणाले, समाजकारण आणि शैक्षणिक कार्याचा वारसा सक्षमपणे पुढे चलवित गेल्या 40 वर्षांपासून समांतर काँग्रेस पक्ष ते आजतागायत संघटनेसह सामाजिक कार्यात व सर्व घटकांना न्याय देत नेहमी अग्रेसर राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी मी नेहमी प्रयत्न करत आलो आहे. यांची नोंद घेऊन देशाचे नेते, ज्यांनी महाराष्ट्र घडविला असे आदरणीय शरद पवारसाहेब निश्चितच मला न्याय देतील.

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य युवराज (बापू) पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, कोल्हापूर शहर अध्यक्ष आर के पोवार, प्रदेश सरचिटणीस आदिल फरास, माजी स्थायी सभापती  राजेश लाटकर, सरचिटणीस अनिल साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर जिल्हा अध्यक्ष अनिल घाटगे, केडीसीसी बँक संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँक संचालक असिफ फरास, कागल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शिवानंद माळी, प्राथमिक जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष जी एस पाटील, पदवीधर शिक्षक संघटनेचे व जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य सुकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी  उपसभापती रमेश तोडकर, संभाजी ब्रिगेड सदस्य व पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaiya Mane filed his nomination from Pune Graduate Legislative Council constituency