दिलासादायक ; अंडी, चिकन, मांस पूर्ण शिजवून खा, कोल्हापूरात बर्ड फल्यु नाही

शिवाजी यादव
Sunday, 24 January 2021

राज्यातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळला आहे. मात्र कोल्हापूरात कुठेही आढळलेला नाही.

कोल्हापूर : जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू आढळलेला नाही तरीही खबरदारीचा भाग म्हणून अंडी, चिकन मांस पूर्ण शिजवून खावे तसेच राज्यातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळला आहे. मात्र कोल्हापूरात कुठेही आढळलेला नाही. तरीही पशू संवर्धन विभाग सतत पहाणी करीत आहे, अशी माहिती पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

गेल्या दोन महिन्यापूर्वी परराज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षापूर्वी बर्ड फ्लूची कोंबड्यांना लागण झाल्याची अफवा उठली. त्यानंतर अनेकांनी चिकन, अंडी खाणे बंद केले. परिणामी पोल्ट्री फार्म चिकन विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यापासून पून्हा बर्ड फ्लूची चर्चा सुरू झाली त्यानंतरही चिकन अंडी मांस व्यवसायावर परिणाम होण्याची वेळ आली. मात्र बर्ड फ्लू कोठे आहे का? याची पहाणी केली असका कोठेही त्याची लागण आढळलेली नाही. रंकाळ्यावर दोन मृत्यू पक्षी आढळले. त्यांनाही बर्ड फ्लू झाला नव्हता. जिल्ह्यातील साडे पाचशेवर कोंबड्याची स्वॅब तपासणी केली त्यातील एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. 

हेही वाचा - 'कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर' मार्गावर आता 'सुपर फास्ट रायडर' धावणार 

वरील सर्व पार्श्‍वभूमीवर पशू संवर्धन विभाग जिल्ह्यातील पोल्ट्री तसेच चिकन विक्रेत्यांना खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे सध्या तरी बर्ड फ्लूचा धोका दिसत नाही. त्यामुळे चिकन, अंडी खरेदी करण्यास हरकत नाही. मात्र असे चिकन, अंडी चांगल्या प्रकारे शिजवून खावीत असे आवाहन डॉ. पठाण यांनी केले आहे. यावेळी अंडी उबवणी केंद्राचे उपायुक्त सुभाष नाईक, पशू संवर्धन पर्यवेक्षक डॉ. सॅम लुड्रीक्‍स उपस्थित होते. 

चिकन, अंड्याचा दर होणार निश्‍चित 

शेतकऱ्यांकडून 50 ते 70 रूपयाला कोंबडी खरेदी करून ते चिकन म्हणून 160 ते 200 रूपये अशा भावात विक्री केली जाते. दरातील तफावत दूर व्हावी ग्राहकाला किफायतशीर दरात चिकन मिळावे तसेच कुक्कुटपालनाही चांगला भाव मिळावा यासाठी रेडीरेकनरच्या धर्तीवर भाव निश्‍चित करण्याचा प्रयत्न पशूसंवर्धन विभाग करीत आहे, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.

हेही वाचा -  लग्न उरकून घरी परतत असताना वाटेतच झाला अपघात

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bird flu related press conference said Deputy Commissioner of Animal Husbandry in kolhapur