दार उघड 'उद्धवा' दार उघड : कोल्हापूरातील दहा मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन

BJP bell ringing agitation to open temples Bell ringing in front of ten temples in Kolhapur
BJP bell ringing agitation to open temples Bell ringing in front of ten temples in Kolhapur
Updated on

कोल्हापूर : दार उघड उद्धवा दार उघड..., आमची मंदिरे खुली करा... अशा घोषणा देत हिंदूत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आज घंटानाद आंदोलन केले. शहरातील प्रमूख दहा मंदिरांसमोर हे आंदोलन झाले. राज्यातील सर्व मंदिरे खुली करा या प्रमूख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कोरोनाचा प्रार्दुभाव कमी व्हावा यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामध्ये सर्व मंदिरेही बंद करण्यात आली आहेत. लॉकडाउन शिथिल केल्यामुळे मॉल, मंडई, सर्व दुकाने, शासकीय कार्यालये खुली करण्याची परवागनी दिली आहे. मंदिरे मात्र अद्याप बंदच आहेत. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे खुली करण्याची परवानगी द्या. अशी मागणी राज्यातील सर्वच हिंदूत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाने केली आहे.

यासाठी आज राज्यभर मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. दुपारी 11 वाजता सर्व हिंदूत्ववादी कार्यकर्ते शहरातील दहा मंदिरांसमोर एकत्र आले. यावेळी "दार उघड उद्धवा दार उघड', "आमची मंदिरे खुली करा' अशा घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांना मंदिरे खुली करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ, मृदूंग, झांज यांचे वादन केले. रेणुका मंदिर (कसबा बावडा), वटेश्‍वर मंदिर (एस.टीस्टॅंड), दत्त मंदिर (लक्ष्मीपूरी), मारुती मंदिर (राजारामपूरी), अंबाबाई मंदिर (महाद्वार रोड), दत्त मंदिर (गंगावेश), ओढ्यावरचा गणपती (उमा टॉकीज), रेणुका मंदिर (मंगळवार पेठ) या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिक्कोडे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, सरचिटणीस अशोक देसाई, हेमंत अराध्ये, विजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com