व्हिडिओ : सरसकट कर्जमाफीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात निघाला भव्य मोर्चा...

BJP led march to Kolhapur for farmers loan waiver kolhapur marathi news
BJP led march to Kolhapur for farmers loan waiver kolhapur marathi news

कोल्हापूर -  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज शहरातून भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण समरजीत घाडगे, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे शहर आणि जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही

'हे कसलं सरकार.. फसवे सरकार...' अशा घोषणा देत कार्यकर्ते दसरा चौकामध्ये एकत्र आले. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दसरा चौक,व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. मोर्चानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. प्रामाणिक व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com