गृहमंत्री की वसुलीमंत्री; भाजप कार्यकर्त्यांकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

BJP protest and demand resign from anil deshmukh in kolhapur
BJP protest and demand resign from anil deshmukh in kolhapur
Updated on

कोल्हापूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमूख हे सचीन वाझे यांना महिन्याला शंभर कोटी वसुल करायला सांगत होते, असा खळबळ जनक आरोप केला आहे. यामुळे देशमुख हे गृहमंत्री आहेत की वसुली मंत्री हा प्रश्‍न उपस्थित होते. त्यामुळे गृहमंत्री देशमूख यांची चौकशी झाली पाहिजे. चौकशी निर्पेक्षपणे होण्यासाठी त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहीजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी बिंदू चौकात निदर्शने केली. 

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकारने नैतिकतेच्या सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांनी जे आरोप केले आहेत, ते अत्यंत गंभीर आहेत. यामुळे पोलिस दलावरही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. मंत्रीच जर सर्वसामान्य जनेतेची लूट करत असतील तर जनता सुरक्षीत कशी राहील. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल जनतेला आश्‍वस्त करायचे असेल तर गृहमंत्री देशमूख यांची चौकशी झालीच पाहीजे. पारदर्शक चौकशी होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला पाहीजे.' 

नगरसेवक अजित ठाणेकर, सरचिटणीस अशोक देसाई, हेमंत अराध्ये, उपाध्यक्ष विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, भगवान काटे, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, ओंकार खराडे, राहुल पाटील, विजय खाडे, महेश यादव, अमर साठे, शैलेश जाधव, सचिन सुराणा, कालिदास बोरकर, नरेंद्र पाटील, प्रशांत गजगेश्वर, दिलीप बोंद्रे, किरण नकाते, विराज चिखलीकर, आसावरी जोरदार, प्रज्ञा मालंडकर, गौरव सातपुते, विवेक वोरा सहभागी झाले होते.  
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com