खळबळजनक! कोल्हापूर-सांगली हायवेवर हॉस्पिटलमध्येच सापडला गावठी बॉम्ब

gelatin bomb found in jaysingpur one hospital in sangli
gelatin bomb found in jaysingpur one hospital in sangli

जयसिंगपूर (कोल्हापूर) : शहरातील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील पायोस हॉस्पिटल गावठी बॉम्बने उडवून देण्याचा प्रयत्न पोलिस आणि हॉस्पिटल प्रशासनामुळे असफल ठरला. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. शहरात प्रथमच घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर पोलिस व कोल्हापूर बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या प्रयत्नानंतर सदरचा जिलेटींग (गावठी बॉम्ब) निकामी केल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास घेतला. 

सांगली कोल्हापूर मार्गावरील डॉ. सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या कंपाऊडलगत गुरूवारपासून बेवारस अवस्थेत प्लॉस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडून होते. मात्र, सिक्यूरिटी गार्डने सदरचे साहित्य पेशंटच्या नातेवाईकांचे असेल म्हणून दुर्लक्ष केले होते. रविवारी सकाळी हॉस्पिटमधील भरत पाटील या कर्मचार्‍याच्या हे साहित्य असलेल्या टिक-टिक आवाज आला. यामुळे त्याने तपासले असता आतमध्ये प्लॉस्टिकच्या पाईप, वायर, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य आढळून आले. 

तर या पोत्यामधून बराच अंतरापर्यंत एक केबल पडलेली लक्षात आली. याबाबतची माहिती पाटील यांनी तात्काळ डॉ. सतिश पाटील यांच्या कानावर घालून जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे यांना कळविली. काही वेळातच कोल्हापूरहून बॉम्ब शोध व नाशक पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक असा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. 

दरम्यान, याबाबतची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. हॉटेल शॉमवी व झेले पंपाच्या नजीक बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. डिवायएसपी रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील हेड कॉन्स्टेबल मानसिंग पाटील, विनायक लाटणे, मुस्ताक शेख, पोलिस नाईक जयंत पाटील, अशीष मिठारे, जीवन कांबळे, रवि पाटील, विनायक डोंगरे, 'मर्फी' श्वान यांनी सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदरचा गावठी बाँम्ब निकामी केला. तर तो जागेवरच नष्ट ही करण्यात आला. पुढील तपासाकरीता घटनास्थळावरील साहित्य ताब्यात घेतला. या पथकात पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलिस नाईक गुलाब सनदी, अभिजित भातमारे, अमोल अवघडे, रोहीत डावाळे यांच्यासह पोलिस पथकाचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com