जयंत पाटील भाजपात येणार होते? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

“मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”,

कोल्हापूर :  “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”,अस सूचक वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी करत जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास नकार दिला. आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच पुढील पाच वर्षे हे सरकार राहिल, असे म्हणण्याचा अधिकार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना नाही. हे सरकार स्थापन झाले नसते तर पाटील भाजपमध्ये असते. मी आता काही बोलणार नाही, सांगलीत जाऊन त्यांचा समाचार घेऊ, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. 

राणे  म्हणाले की, भविष्यात सेना-भाजप अशी युती होणार नाही. मात्र लवकरच वेगळे सरकार स्थापन होईल. महाविकास आघाडीतील दोन पक्ष कुठेच दिसत नाही. उद्धव ठाकरे तेवढेच बोलताना दिसतात. यावरून दोन्ही पक्षांचे काय राजकारण सुरू आहे, हे तुम्हीच ओळखा. भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला घेऊन सत्ता स्थापन करणार का? या प्रश्‍नाला मात्र त्यांनी बगल दिली. अभिनेता सुशांत राजपूरकर याचा खुन झाला असून ती आत्महत्या असल्याचे दाखवून पचवले जात आहे,असा आरोप त्यांनी केला आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state president Chandrakant Patil criticism on State Water Resources Minister Jayant Patil kolhapur