गडहिंग्लजला भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर 

अवधूत पाटील
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

गडहिंग्लजला भाजपतर्फे जम्बो शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी राजेंद्र तारळे यांची फेरनिवड झाली आहे. तर महिला शहराध्यक्षपदी डॉ. बेनिता डायस यांना तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तुषार मुरगूडे यांना संधी देण्यात आली आहे. विविध पाच विभागात 52 जणांची नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली

गडहिंग्लज : भाजपतर्फे जम्बो शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी राजेंद्र तारळे यांची फेरनिवड झाली आहे. तर महिला शहराध्यक्षपदी डॉ. बेनिता डायस यांना तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तुषार मुरगूडे यांना संधी देण्यात आली आहे. विविध पाच विभागात 52 जणांची नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. 

घाटगे म्हणाले, ""कार्यकारणीतील निवड केवळ पक्षापुरती मर्यादित न ठेऊ नका. कुणाचीही उणीदुणी काढत न बसता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आज खरी गरज आहे. कर्जमाफी व सातबारा कोरा करेपर्यंत लढाई लढली पाहिजे. कोल्हापूरात मोर्चाच्या माध्यमातून उठविलेला आवाज राज्यव्यापी करण्याची गरज आहे. मिळालेल्या पदाचा समाजासाठी व शेतकरी हितासाठी उपयोग करावा.'' राजेंद्र तारळे यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, दीपक पाटील, डॉ. बेनिता डायस, अर्चना रिंगणे, एल. टी. नवलाज यांची भाषणे झाली. रमेश रिंगणे, चंद्रकांत सावंत, विठ्ठल भमान्नगोळ आदी उपस्थित होते. 

कार्यकारणी अशी; शहर कार्यकारणी : राजेंद्र तारळे (शहराध्यक्ष), युवराज बरगे, संदीप कुरळे, अमित भिउंगडे, शिवानंद पाटील (उपाध्यक्ष), आनंद पेडणेकर (सरचिटणीस), अमर पोटे (चिटणीस), रमेश पाटील (कोषाध्यक्ष). शहर महिला कार्यकारणी : डॉ. बेनिता डायस (अध्यक्षा), मनिषा कुरळे, क्रांती पोटे, दीपा कुलकर्णी, स्नेहलता देशपांडे (उपाध्यक्षा), द्राक्षायणी घुगरी (सरचिटणीस), गायत्री पाटील (चिटणीस), वैशाली पाटील (कोषाध्यक्षा). युवा मोर्चा शहर कार्यकारणी : तुषार मुरगुडे (अध्यक्ष), संग्राम कुराडे (कार्याध्यक्ष), राहुल हिडदुगी, शिवराज खापरे, मनिष पटेल (उपाध्यक्ष), हर्षल घोरपडे (सरचिटणीस). 

सागर गंधवाले, शिवराज शिंदे, अमित भिऊंगडे, शिवराज तुरंबतमठ, राहूल शिंदे, प्रकाश पाटील, सुनील चव्हाण, शैलेंद्र कावणेकर, अमर पोटे यांची अनुक्रमे एक ते नऊ प्रभाग अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय विविध सेलच्या प्रमुखपदी वीस जणांची निवड करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's Jumbo Executive Announces In Gadhinglaj Kolhapur Marathi News