कोरोनाच्या लढ्यासाठी ७१ तरुणांनी उचलले हे पाऊल.....

The blood donation camp took place on the birthday of the sarpanc in bele kolhapur marathi news
The blood donation camp took place on the birthday of the sarpanc in bele kolhapur marathi news

कोल्हापूर :बेले (ता .करवीर )येथे कोरोना विरुद्ध कृतीसमितीच्या वतीने सरपंच राजेंद्र कारंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरास तहसीलदारांकडून परवानगी घेणेपासून, शिबीर गर्दी न करता शांततेत पार पाडण्यासाठी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य केले. 

गावा गावात राक्तदान शिबिरे गरजेची

यावेळी बोलताना सुर्यवंशी म्हणाले की , संपूर्ण जग, आपला देश,आज कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराशी संघर्ष करीत आहे. रक्तपेढी मध्ये असलेला रक्त साठा कमी होत आहे. म्हणून गावा गावात राक्तदान शिबिरे आयोजित करणे आवश्यक आहे. आजचे रक्तदान शिबिर हा त्याचाच हा एक भाग आहे. आज बेले गावातील ७१ तरुणांनी रक्त दान करून राष्ट्रीय अपत्तातीत आपले योगदान दिले आहे.

.७१ तरुणांनी केले रक्तदान..​

या कार्यक्रमास भोगावतीचे संचालक शिवाजी कारंडे,माजी सरपंच पंढरीनाथ मोरे,तानाजी आदीगरे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत टिपूगडे,तानाजी पाटील,अशोक कारंडे ,ग्रामसेवक दिलीप कांबळे,पोलीस पाटील सुहास टिपूगडे यांचे मार्गदर्शन व गावातील तरुणांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com