VIDEO - 'मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा'; कोल्हापुरकरांचा प्रतिसाद

blood donation in kolhapur before vaccination is useful for people
blood donation in kolhapur before vaccination is useful for people

कोल्हापूर : 'मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा,' असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रेल्वे स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात आज रक्तदान शिबिर झाले. पालकमंत्री पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  शिबिराला प्रारंभ झाला. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्तसाठा कमी असल्याने, त्या पार्श्वभूमीवर शिबिराचे आयोजन केले होते. पालकमंत्री पाटील यांनी शिबिरात सहभागी होत रक्तदान केले. माजी महापौर निलीफर आजरेकर, आमदार पाटील, स्वाती नलवडे, उज्वला चौगले, पद्मिनी माने, शिवांगी खोत यांच्यासह उजळाइवाडी येथील राहुल मिनेकर आणि निशा मिनेकर या दाम्पत्याने रक्तदान केले. रक्तदात्यांना पालकमंत्री पाटील आमदार पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, विद्याधर  गुरबे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, प्रविण केसरकर, सचिन चव्हाण, संजय पवार-वाईकर, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, रंगराव देवणे, जय पटकारे, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, दीपक थोरात, संध्या घोटणे, चंदा बेलेकर, लीला धुमाळ, हेमलता माने, सुलोचना नायकवडी, पूजा आरडे, विद्या घोरपडे  उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सीपीआर, राजर्षी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले.   
 
"कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रक्तसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते रक्तदान करून हातभार लावण्याचे काम करत आहेत. सामाजिक बांधिलकी हा काँग्रेसचा पाया आहे. राज्यभरातील आरोग्य यंत्रणेला रक्तदानाच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका नागरिकांनी घ्यावी. शासकीय निर्देशांचे पालन केल्यास रक्तदान करताना कोणताही धोका होणार नाही."

- सतेज पाटील (पालकमंत्री)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com