esakal | 'चंद्रकांतदादांसारखे खाते असते तर काचेचे रस्ते केले असते'

बोलून बातमी शोधा

body change of zilla parishad kolhapur said hasan mushrif in kolhapur

गोकुळ निवडणुकीपर्यंत हा निधी देखील सदस्यांना देण्यात येईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. 

'चंद्रकांतदादांसारखे खाते असते तर काचेचे रस्ते केले असते'
sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाने विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकालाची सांगता होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सर्वपक्षीय सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. यातील 50 टक्‍के म्हणजेच प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे पत्र ना. मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील उपस्थित होत्या. 

मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना भेदभाव न करता सर्व सदस्यांना समान म्हणजे प्रत्येकी 20 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 3054 या हेडअंतर्गत प्रत्येकी 10 लाख रुपये कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्यांना 6 कोटी 70 लाख रुपयांचा निधी देण्यात येत आहे. तसेच 2515 या हेडअंतर्गत प्रत्येकी 10 लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र वित्त विभागात तांत्रीक अडचण आल्याने थोडा विलंब होत आहे. मात्र गोकुळ निवडणुकीपर्यंत हा निधी देखील सदस्यांना देण्यात येईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. 

हेही वाचा - महाडिकांनी माझी वैयक्‍तीक कळ काढू नये; मुश्रीफांनी दिला दम

दादांसारखे खाते असते तर सोन्याचे रस्ते 

चंद्रकांतदादा हे भाग्यवान होते. त्यांना मोठी खाती मिळाली. बांधकाम सारखे अत्यंत महत्वाचे खाते मिळाले. मला जर हे खाते मिळाले असते तर जिल्ह्यात सोन्याचे रस्ते केले असते, असे सांगतच चंद्रकांतदादांना मात्र ही संधी साधता न आल्याचे त्यांनी सांगितले. 
 
निधी देतोय, गोकुळचे बघा 

निधी देताना आपण कोणताही भेदभाव करत नाही. सर्वसदस्यांना समान निधी देत आहे. त्यामुळे सदस्यांनीही गोकुळेच बघावे, असे मुश्रीफ यांनी सांगताच सर्वत्र हशा पिकला. उद्या गोकुळच्या ठराव धारकांनी आपल्या गावच्या विकासासाठी निधी मागितला तर तो देखील दिला जाईल, असे मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले. गावच्या विकासासाठी ठरावधारकांनी निधी मागितल्यास त्यात गैर काय, अशी उलट विचारणाही मुश्रीफ यांनी केली. 
 
नवीन आर्थिक वर्षाचा निधी खर्च करु नका 

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल चार महिन्यापुर्वीच संपला आहे. त्यामुळे सतत पदाधिकारी बदलाची मागणी होत आहे. दोन्ही मंत्र्यांनीही पदाधिकारी बदलास संमती दिली आहे. मात्र जाता जाता पदाधिकारी शिल्लक रक्‍कम खर्च करण्याच्या मागे लागले आहेत. याबाबत सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार नवीन आर्थिक वर्षातील निधी खर्च करु नका, अशी सुचना ना. सतेज पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांना दिली असल्याचे सांगण्यात आले.