esakal | महाडिकांनी माझी वैयक्‍तीक कळ काढू नये; मुश्रीफांनी दिला दम

बोलून बातमी शोधा

minister for rural development hasan mushrif criticism on dhananjay mahadik political marathi news

आम्ही जर भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर बोलायला सुरुवात केली तर माजी खासदार धनंजय महाडिक यांची बोलती बंद होईल.

महाडिकांनी माझी वैयक्‍तीक कळ काढू नये; मुश्रीफांनी दिला दम
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :आमचा आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचा साखर कारखाना अत्यंत चांगल्या पध्दतीने व उत्तम सुरु आहे. जिल्हा बॅंकही चांगली चालली आहे. मात्र आम्ही जर भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर बोलायला सुरुवात केली तर माजी खासदार धनंजय महाडिक यांची बोलती बंद होईल. त्यामुळे माझी कळ काढायला जावू नका, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोकुळ निवडणुकीत आजरा, चंदगड दौऱ्यावर असताना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील तीन मंत्री, दोन खासदार व पाच, सात आमदारांना गोकुळची हाव सुटली आहे, अशी टीका केली होती. तसेच विरोधकांनी मोट केली असून त्यांच्याकडे जर गोकुळ संघ गेला तर त्याची घडी विस्कटेल, असे वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्याचा समाचार आज मुश्रीफ यांनी घेतला. महाडिक यांचे वक्‍तव्य चुकीचे असून त्यांनी असे बोलण्याची गरज नव्हती, असेही .मुश्रीफ यांनी सांगितले. 

हेही वाचा- एकहाती सत्तेचा मार्ग ‘जनसुराज्य’साठी अवघड; कोल्हापूरातील दिग्गज नेत्यांचे पन्हाळ्यावर लक्ष

गोकुळ निवडणुकीबाबत आमदार पी.एन.पाटील यांच्यासोबत चर्चा सुरु होती. मात्र ही चर्चा पुढे न गेल्याने याला पूर्णविराम देण्यात आला. आघाडीची घोषणा करत असताना आम्ही ना गिला है ना शिकवा है, असे सांगितले होते. गोकुळच्या निवडणुकीत इतर कोणत्याही मुद्यावर चर्चा न करता जे चांगले मुददे आहेत त्यावर बोलण्याचा निर्णय घेतला होता. गोकुळ दध संघ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा करु, वासाच्या दूधाबाबत दूध उत्पादकांच्या तीव्र भावना आहेत याबाबत योग्य तो निर्णय घेवू, दुधाला 2 ते 4 रुपये देवू अशी आम्ही घोषणा केली होती, असेही .मुश्रीफ यांनी सांगितले. 

महाडिकांनी वक्‍तव्ये ताबडतोब बंद करावीत.गोकुळच्या निवडणुकीत आम्ही चांगले बोलत असताना महाडिक यांनी चुकीचे वक्‍तव्य केले आहे. आम्ही जर गोकुळच्या नोकर भरतीत 15 ते 20 लाख रुपयांचा होत असलेला बाजार, टॅंकर घोटाळा, मुंबईतील दुधाच्या एजन्सी यासह महाडिक यांच्या भिमा कारखान्यावर बोलायला सुरुवात केली तर फार वाईट होईल. म्हणूनच धनंजय महाडिक यांनी अशा प्रकारची वक्‍तव्ये ताबडतोब बंद करावीत. निवडणुकीच्या अनुषंगाने चांगल्या बाजू मांडाव्यात. माझी व्यक्‍तीगत कळ काढण्याचा नादाला त्यांनी लागू नये, असा इशारा यावेळी मुश्रीफ यांनी दिला.

संपादन- अर्चना बनगे