sakal

बोलून बातमी शोधा

boy dies due electric shock incident turbhe in kolhapur

यश पुंडलीक बिर्जे (वय-१३, रा. यादववाडी) असे या दुर्देवी विद्यार्थ्याचे नाव आहे.

टेरेसवर खेळत असताना मुलासोबत घडली दुर्देवी घटना 

sakal_logo
By
युवराज पाटील

शिरोली पुलाची(कोल्हापूर) : घराच्या टेरसवर खेळत असताना लोखंडी सळीचा विद्युत वाहिनीला स्पर्श होवून बसलेल्या विजेच्या धक्क्यात सातवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यश पुंडलीक बिर्जे (वय-१३, रा. यादववाडी) असे या दुर्देवी विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवारी सकाळी घटना घडली. 


याबाबत माहिती अशी, यश हा आपल्या मित्रा सोबत घराच्या टेरसवर खेळत होता. त्याच्या हातात लोखंडी सळी होती. त्या सळीचा स्पर्श विद्युत वाहिनीला झाला. त्यामुळे यशला शॉक बसला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घराचे बांधकाम अंतीम टप्प्यात असून, गुरुवारी (ता. ६) वास्तुशांती होती ; मात्र त्यापूर्वीच घरावर मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तो कौतुक विद्यालयात सातवीत शिकत होता. वडील मेकॅनिकलचे काम करतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. यश हा एकूलता एक मुलगा अकस्मित मयत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे पण वाचा कोल्हापूरच्या उपनगरांतील गुन्हेगारीला आता बसणार आळा

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top