esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Dedication ceremony of control room in kolhapur

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकल्पाची निविदा राबविण्यात आली असून सुरुवातीच्या प्रस्तावीत ९७ कॅमेऱ्या ऐवजी शिल्लक रकमेतून मोरेवाडी ६३, पाचगाव ५६, कळंबा २८ असे एकून १४७ ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत.

कोल्हापूरच्या उपनगरांतील गुन्हेगारीला आता बसणार आळा 

sakal_logo
By
प्रकाश पाटील

कंदलगाव - कोल्हापूर शहरासह उपनगरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार गुन्ह्याचे प्रमाणही वाढले असून त्यामुळे पाचगाव, मोरेवाडी, कळंबा या उपनगरात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या, चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यास आळा घालणे, महिला सुरक्षा यासाठी परिसरात पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रयत्नातून व जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१९-२०मध्ये मंजूर निधीतून पाचगाव येथील षटकोणी शाळेत कंट्रोल रूमचा लोकार्पण सोहळा पार पडला.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकल्पाची निविदा राबविण्यात आली असून सुरुवातीच्या प्रस्तावीत ९७ कॅमेऱ्या ऐवजी शिल्लक रकमेतून मोरेवाडी ६३, पाचगाव ५६, कळंबा २८ असे एकून १४७ ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत.

परिसरातील सीसीटिव्ही कंट्रोल रूमसाठी पाचगाव पंचशील कॉलनी येथील षटकोणी शाळेचा एक रिकामा वर्ग पाच वर्षाच्या भाडे तत्वावर उपलब्ध करून दिला आहे. या षटकोणी शाळेचे नुतनीकरण पाचगाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे. यावेळी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी संबधीत पोलिसांना परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून माहितीच्या आधारे योग्य ती कारवाई वेळेत करण्याच्या सुचना देऊन सीसीटिव्हीमुळे नक्कीच गुन्हे कमी होतील अशी आशा व्यक्त केली.

हे पण वाचा - ब्रेकिंग -  कोल्हापूरमध्ये कोरोनाचा कहरच ; आणखी २४२ जणांना कोरोनाची बाधा.. 


कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते व्हिडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून झाले. यावेळी व्हिडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, आमदार ऋतूराज पाटील, जिल्हा अधिकारी दौलत देसाई , पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमन मित्तल ,अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांची उपस्थिती होती.
 

संपादन - धनाजी सुर्वे  

go to top