ह्दयद्रावक : शनिवारी झाला वाढदिवस अन् रविवारी घेतला जगाचा निरोप; आर्मीत जायचे स्वप्न अधुरेच

boys dead in accident khanapur belgaum
boys dead in accident khanapur belgaum
Updated on

खानापूर - शनिवारीच त्याने मित्र आणि कुटूंबीयांसोबत वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला होता. रविवारी पाहुण्यांकडे जाऊन घरी परतांना दुचाकी घसरल्याचे निमित्त झाले आणि त्याने जगाचा निरोप घेतला. हृदय पिवळटणारी ही घटना कारलगा-लालवाडीदरम्यान घडली. या घटनेत सुमेश उर्फ निलेश बाळकृष्ण शिंदे (वय 19, मुळचा झाडनावगा, सध्या रा. मारूतीनगर खानापूर) हा ठार झाला. 


याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, सुमेश हा कारलग्याहून खानापूरकडे येत होता. लालवाडीजवळील एका पुलावर त्याची दुचाकी घसरून तो पुलाच्या खाली फेकला गेला. दुचाकी रस्त्यावर पडली होती. उंचावरून पडल्याने सुमेशला वर्मी मार बसला. शिवाय त्याच आवस्थेत तो बराच काळ तेथे पडून होता. वेळेत उपचार झाले नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

सुमेश पुलाखाली पडला असतांना रस्त्यावरून अनेकजण ये-जा करीत होते. पण, कुणीही त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केला नाही. जणू माणुसकी हरविल्याचा प्रचिती या घटनेतून येते. त्याला गंभीर इजा झाली नसतांनाही केवळ वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक यु.एस.आवटी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. मयत सुमेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. 

आर्मीत जायचे स्वप्न अधुरेच..

झाड नावगे येथील शिंदे कुटूंबातील अनेक जण लष्करात आहेत. सुमेश वडीलही लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्याचा मोठा भाऊ लष्करात सेवा बजावत आहे. सुमेशची लष्करात निवड झाली होती. कांही दिवसांतच तो रुजू होणार होता. पण, तत्पूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याचे दोन सख्खे चुलत भाऊही लष्करात सेवा बजावत आहेत. या घटनेमुळे शिंदे कुटूंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com