मोठे रस्ते, आग प्रतिबंध उपाय करा, सीपीआरच्या फायर ऑडिटमध्ये सुचना,

युवराज पाटील
Tuesday, 10 November 2020

कोल्हापूरः एखाद्या वेळी आग लागलीच तर फायर फायटर जाण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातील रस्ते मोठे करा. आग प्रतिबंधाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे महापालिकेने नुकत्याच केलेल्या फायर ऑडिटमध्ये निष्कर्ष नोंदविला आहे. सीपीआरचे फायर ऑडिटसह विद्युत ऑडिटही पूर्ण झाले आहे. 
 

कोल्हापूरः एखाद्या वेळी आग लागलीच तर फायर फायटर जाण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातील रस्ते मोठे करा. आग प्रतिबंधाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे महापालिकेने नुकत्याच केलेल्या फायर ऑडिटमध्ये निष्कर्ष नोंदविला आहे. सीपीआरचे फायर ऑडिटसह विद्युत ऑडिटही पूर्ण झाले आहे. 
कोरोनाच्या काळात ट्रॉमा केअर सेंटरला आग लागली होती. यात काही रुग्ण गुदमरले होते. प्रसंगवधान राखून पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम केलेल्या एकाने मेन स्वीच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त झाली होती. सीपीआरमध्ये 24 तास रुग्णांचा राबता असतो. प्रवेशासाठी तीन मुख्य दरवाजे आहेत. 
कोरोनाच्या काळातही एखादा रुग्ण पळून जाऊ नये, यासाठी 24 तास बंदोबस्त होता. सीपीआरची मुख्य इमारत ऐतहासिक वास्तू आहे. दगडी बांधकामात घडवलेली इमारत आजही मजबूत आहे. पाठीमागील बाजूला हृदयशस्त्रक्रिया विभाग, तसेच अन्य रोगांवर उपचार घेणाऱ्यांना येथे दाखल केले जाते. या इमारती उंच आहेत. त्या बांधतानाच हवा खेळती राहिल. रुग्णांची ये-जा करण्यासाठी ऍक्‍सेस राहिल याची दक्षता घेण्यात आली. 
थोड्या काळासाठी वीज गेली तरी सीपीआरचे काम ठप्प होते. त्या दृष्टीने विद्युत यंत्रणा महत्वाची आहे. आगीची घटना घडल्यानंतर फायर तसेच विद्युत ऑडिटीकरणाचा निर्णय झाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने केलेल्या ऑडिटममध्ये आग तातडीने विझविण्यासाठी तातडीची साधनसामुग्री आवश्‍यक आहे ती तात्काळ बसविण्यासंबंधी सूचना करण्यात आली आहे. आगीची घटना घडल्यानंतर लक्ष्मीपुरी रिलाएन्स मॉलमधील आगीचा बंब तातडीने दाखल होऊ शकतो. नंतर कसबा, बावडा, ताराराणी चौक येथील बंब येऊ शकतात. मात्र बंबांना तातडीने ये-जा करावी असे रुग्णालय परिसरात रस्ते नाहीत. त्या दृष्टीने रस्ते मोठे करावेत, अशी सूचना केली आहे. फायर तसेच विद्युत ऑडिट पूर्ण झाल्यानंतर यासंबंधी नुकतीच बैठक झाली. 

अग्निशमन दलाने सीपीआरचे फायर ऑडिट पूर्ण केले आहे. विद्युत ऑडिट ही पूर्ण झाले आहे. आमच्या दृष्टीने सीपीआरचे आतील रस्ते मोठे होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास फायर फायटरची ये-जा करणे सोपे होणार आहे. आग प्रतिबंधासाठी उपायोजना कराव्या लागणार आहेत त्यासंबंधी फायर ऑडिटमध्ये सूचना केली आहे. 
-रणजित चिले. प्रभारी अग्निशमन अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: broad ways, fire prevention measures, instructions in CPR's fire audit,