
मांडरेसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
शिरोली दुमाला (जि. कोल्हापूर) : मांडरे (ता. करवीर) येथे भावजयीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दिराचे निधन झाले. त्यामुळे मांडरेसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
कऱ्हाड शहराचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी भगवान पाटील (वय 61) व त्यांचे भाऊ सदाशिव रामचंद्र पाटील (वय 65) असे निधन झालेल्या भावजय व दिराचे नाव आहे. लक्ष्मी यांच्यावर कऱ्हाडमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे शनिवारी दुपारी निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सदाशिव पाटील यांचे निधन झाले. लक्ष्मी यांनी काही वर्षे करवीर महिला कॉंग्रेस समितीवर अध्यक्ष म्हणून काम केले होते. याशिवाय राष्ट्रीय खेळाडू, उत्कृष्ट चित्रकार होत्या. औंध संग्रहालयात त्यांचे चित्र संग्रही आहे.
हे पण वाचा - धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार
पाटील कुटुंबीय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. माजी सरपंच व करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रामजी पाटील यांच्या कार्याचा वारसा घेत गावात त्यांनी अनुराधा फाउंडेशनची स्थापना केली. तुळशी खोऱ्यातील जनतेसाठी कायमस्वरूपी मोफत रुग्णवाहिका सुरू केली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे