येडीयुराप्पांचे 'ते' वादग्रस्त विधान; कोल्हापुरात शिवसेना झाली आक्रमक

युवराज पाटील
Tuesday, 19 January 2021

"कर्नाटकातील एकाही मंत्र्यांला महाराष्ट्रात फिरू देणार नाही"
 शिवसेना झाली आक्रमक

कोल्हापूर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान यापुढे सहन करणार नाहीच शिवाय त्यांच्यासंबंधी यापुढे अपशब्द वापरल्यास कर्नाटकातील एकाही मंत्र्यांला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमूख विजय देवणे यांनी आज दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या निषेधाच्या घोषणा देत शिवसेनेने आज त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. मिरजकर तिकटी येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलन झाले. 

येडीयुराप्पा यांनी महाराष्ट्रासंबंधी वादग्रस्त विधान केले होते. शिवसेना जिल्हाप्रमूख विजय देवणे यांच्यासह सुजित चव्हाण, दत्ता टिपुगडे, राजेंद्र जाधव, शशी बिडकर, मंजित माने, प्रविण पालव एकत्रित आले. बेळगावमध्ये ठाकरे याचा अवमान झाला तो यापुढे सहन करणार नाही. कर्नाटक सरकारचा असाच व्यवहार राहिला तर कर्नाटकातील एकाही माणसाला सोडणार नाही असा इशारा देवणे यांनी आंदोलनानंतर दिला. 

हेही वाचा- मानाचा मुजरा भोवला: अलका कुबल,प्रिया बेर्डे, ,विजय पाटकर यांना मोठा दणका ; दहा लाख भरण्याचे आदेश 

ते म्हणाले, कर्नाटकच्या एकाही मंत्र्यांने यापुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत अपशब्द वापरू नये अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही. बेळगाव महापालिकेसमोर लाल तसेच पिवळ्या रंगाचा ध्वज लावला गेला आहे. तो तातडीने काढून घ्यावा. अन्यथा बेळगाव येथे 21 जानेवारीच्या बेळगाव येथील मोर्चात कोल्हापुरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. समोरच्या रस्त्याने जाऊन आम्ही ध्वज उतरवू असेही देवणे यांनी नमूद केले. येडीयुराप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.  

संपादन- अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burning of the statue of Yeddyurappa in kolhapur