कळंबा कारागृहात फेकलेल्या मोबाईलसह गांजाचा अखेर छडा

case of kalamba jail drugs solve four people included in this crime in kolhapur
case of kalamba jail drugs solve four people included in this crime in kolhapur
Updated on

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात फेकलेल्या १० मोबाईलसह गांजा प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. चौघांनी हे कृत्य केले असून, यात दोघा पैलवानांचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली. त्यातील एका संशयित पैलवानास ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर मोटारही जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे  दिली. 

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भीष्म्या ऊर्फ भीमा सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, सांगली), राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ (रा. जयसिंगपूर), ऋषिकेश सदाशिव पाटील (वय २५, रा. कोदवडे, राधानगरी), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडीये रायबाग, ता. कडेगाव, सांगली) अशी आहेत. 

कळंबा कारागृहात एका मोटारीतून आलेल्या संशयितांनी २२ डिसेंबरला मध्यरात्री संरक्षण भिंतीवरून फडक्‍यात बांधलेली तीन पुडकी फेकली. त्यात १० मोबाईल, पाऊण किलो गांजा, दोन पेन ड्राईव्ह मिळून आले. एकाचवेळी कारागृहात १० मोबाईल सापडल्याने कारागृह प्रशासनातही खळबळ उडाली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 


संशयित धुमाळचे कृत्य

संशयित भीष्म्या चव्हाण, राजेंद्र धुमाळ २२ डिसेंबरला मध्यरात्री सव्वाच्या सुमारास आलिशान मोटारीतून कोल्हापुरात आले. त्यांनी गंगावेस परिसरातून ऋषिकेश पाटील व जयपाल वाघमोडेला सोबत घेतले. ते सर्व मोटारीतून कळंबा कारागृहासमोरील रस्त्यावरील तट क्रमांक एकच्या संरक्षण भिंतीजवळ थांबले. येथे धुमाळ मोटारीतून खाली उतरला. त्यानेच कारागृहात मोबाईल, गांजा, चार्जर, पेन ड्राईव्ह फेकल्याची माहिती तपासात पुढे आली. 

संशयित खंडेलवालशी संबध...

संशयित ऋषिकेश व जयपाल पैलवानकीसाठी कोल्हापुरात आले होते. ते काही वर्षांपासून एकत्र राहात होते. ऋषिकेशची दीड वर्षापासून संशयित चव्हाण, धुमाळची ओळख झाली. चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यासह ऋषिकेश सध्या कळंबा कारागृहात मोकाअंतर्गत गुन्ह्यातील संशयित विकास खंडेलवाल याच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. 

"या प्रकरणात कारागृहाच्या आतील कोणाचातरी सहभाग असावा, असा संशय बळावला आहे. त्या अनुषंगानेही तपास सुरू असून, लवकरच याची पाळेमुळे खणून काढू."

- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Kolhapur water pumping banned?
Falling River Levels Trigger Water Scarcity Fears Across Kolhapur District
Kolhapur irrigation ban relaxation for farmers
Nagardale police constable news
Marathi News Esakal
www.esakal.com