गर्दीचा फायदा घेऊन दोन तरुणांच्या गळ्यातील चेन लंपास 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

फुलवाडी रिंगरोडवर 8 जानेवारीला सायंकाळी एका शाखेच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम होता

कोल्हापूर - कार्यक्रमातील गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने दोघा तरूणांच्या गळ्यातील सुमारे चार तोळे वजनाच्या दोन चेन हातोहात लंपास केल्या. फुलेवाडी रिंगरोडवर हा प्रकार घडला. याची नोंद करवीर पोलिसात झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, फुलवाडी रिंगरोडवर 8 जानेवारीला सायंकाळी एका शाखेच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास आकाश पांडुरंग पाटील (वय 23, रा. राजोपाध्येनगर) व त्यांचे मित्र योगेश पाटील हे दोघे गेले होते. या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन आणि आठरा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन हातोहात लांबविल्या.

हे पण वाचाधक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

काही वेळाने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. आकाश पाटील यांनी याबाबत करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात 1 लाख 90 हजार रूपये किमंतीचे दागिने चोरीस गेल्याची नोंद झाली. 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chain snatching in kolhapur phulewadi