आमदार डॉ. विनय कोरे यांना मातृशोक

chairperson of tatyasaheb kore factory shobhatai kore dead in solapur she is mother of MIA vinay kore
chairperson of tatyasaheb kore factory shobhatai kore dead in solapur she is mother of MIA vinay kore

वारणानगर ( कोल्हापूर) : वारणा महिला उद्योग समूह, वारणा बझार व तात्यासाहेब कोरे वारणा सह साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे (वय ७७) यांचे आज सोमवारी पहाटे सोलापूर येथे निधन झाले. श्रीमती शोभाताई कोरे या गेली काही दिवस अजारी होत्या. सोलापूर येथे असणाऱ्या कन्या व जावई यांच्या हॉस्पीटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

वारणा समूहाचे संस्थापक वारणा खो-याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी  तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा स्व. श्रीमती सावित्रीआक्का विश्वनाथ तथा तात्यासाहेब  कोरे यांच्या कार्याचा, संस्कारांचा वसा  व वारसा समर्थपणे श्रीमती शोभाताई कोरे यांनी चालवला. सहकार, शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केले. 

महीला उद्योग व शिक्षण  क्षेत्रात सर्वांना मार्गदर्शक ठरलेल्या शोभाताई कोरे या वारणा समूहात आईसाहेब  या नावाने सर्वत्र परिचीत होत्या. वारणा बॅंकेचे चेअरमन निपून कोरे, वारणा समूहाचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार  डॉ. विनय कोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती शोभाताई कोरे यांच्या निधनाने वारणा समूहासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

मॅालच्या युगात ग्रामीण भागात सहकारी तत्वावरील वारणा बझारला घराघरापर्यत पोहचविण्याचे त्यांनी काम केले. हजारो महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. सहकारातील आदर्श कामामुळे त्यांना देशभरातील पुरस्कार मिळाले. त्यांनी परदेशात जाऊन प्रशिक्षण घेतले. त्याचा लाभ वारणातील संस्थांना झाला. त्यांच्या निधनाने वारणा समूहात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.

 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com