चंदगड नगरपंचायतीला पंचायत समितीची जुनी इमारत

सुनील कोंडुसकर
Saturday, 16 January 2021

चंदगड येथील नगर पंचायतीला पंचायत समितीची जुनी इमारत वापरण्यास परवानगी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला.

चंदगड : येथील नगर पंचायतीला पंचायत समितीची जुनी इमारत वापरण्यास परवानगी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला. सभापती ऍड. अनंत कांबळे यांनी या इमारतीची चावी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्याकडे सुपूर्त केली. 

एक वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. मात्र नगरपंचायतीचे कामकाज ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयातूनच सुरू आहे. नगरपंचायतीच्या नियमानुसार विविध विभाग आणि त्यांचे कामकाज चालवण्यासाठी ती इमारत अपुरी पडत होती. याच दरम्यान चंदगड पंचायत समितीची नवीन इमारत स्थापन होऊन जुन्या इमारतीतील सर्व कारभार नवीन इमारतीत गेल्यामुळे जुनी इमारत रिकामी होती.

ही इमारतनगर पंचायतीला वापरायला मिळावी, अशी मागणी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. यानुसार नुकताच हा निर्णय झाला व ही इमारत नगरपंचायतीला वापरायला परवानगी देण्यात आली.

सभापती कांबळे यांनी या इमारतीची चावी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्याकडे सुपूर्त केली. या वेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, पंचायत समिती सदस्य दयानंद कानेकर, प्रमोद कांबळे, संजय चंदगडकर, बाळासाहेब हळदणकर, किरण नाईक, अनिता परीट उपस्थित होते. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad Nagar Panchayat Will Get Panchayat Samiti Building Kolhapur Marathi News