ख्रिस्ती युवकांना उद्योगशील बनविणार

chandrakant jadhav said in to promote for chris chan community youth in kolhapur
chandrakant jadhav said in to promote for chris chan community youth in kolhapur

कोल्हापूर : ख्रिस्ती युवक मंचच्या वर्धापनदिनी ख्रिस्ती युवकांना उद्योगशील बनविण्याचा उपक्रम या मंचतर्फे हाती घेण्यात आला. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने झाला. कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी जगन्नाथ हिरवे, रेव्हं. एस. बी. पठाणे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, ॲड. विल्सन नाथन आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात धार्मिक गाण्यांनी प्रणिता माळी यांच्या टीमद्वारे झाली. प्रार्थना रेव्ह. श्रीकांत पठाणे यांनी केली.
यावेळी रेव्ह. जगन्नाथ हिरवे यांनी मार्गदर्शन केले. ख्रिस्ती धर्मातील युवकांना उद्योगशील बनवण्यासाठी मंच इथून पुढे प्रयत्नशील राहणार आहे. याचा पुढील काळात बघायला मिळेल, असा संकल्प मंचच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.  यावेळी पृथ्वीराज अजित मोरे, डॉ. प्रशांत जमने, ॲड. विल्सन नाथन व रेव्ह  बी. जी. मोरे उपस्थित होते.  

कोविड काळात ख्रिस्ती युवक मंचच्या खांद्याला खांदा लावून ग्राउंड लेव्हलवर काम केलेल्या रेव्ह. अशोक गायकवाड व रेव्ह. सिनॉय काळे यांचा गौरव झाला. प्रसिद्ध ख्रिस्ती कीर्तनकार एस. व्ही. नावगिरे यांनी त्यांच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध केले. त्यांना ख्रिस्ती युवक मंच संघटनेतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी मंचचे अध्यक्ष वॉल्टर कट्टी, उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे, सेक्रेटरी शाबेद वाघमारे, खजिनदार रमेश रणभिसे, अब्राहम वाघमारे, दिनकर जाधव, निशिकांत कांबळे, अजय समुद्रे, अनोश गायकवाड, शशिकांत कालेकर, सॅम्युएल ऊरुणकर, गौरव घुणकीकर, जोशूआ कामत, आशुतोष बेडेकर, सुधीर लोंढे, तिमथी मिसाळ, विनय चिले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अतुल घाडगे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com