esakal | परिवहन समिती सभापतीपदी चंद्रकांत सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Pandurang Suryavanshi elected as Transport Committee Chairman

 परिवहन समितीच्या सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली.  

परिवहन समिती सभापतीपदी चंद्रकांत सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड 

sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर  : महानगरपालिका परिवहन समितीचे 51 वे सभापती म्हणून चंद्रकांत पांडुरंग सुर्यवंशी यांची आज बिनविरोध निवड झाली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे होते.

 परिवहन समितीच्या सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली.  परिवहन समिती सभापती पदासाठी निर्धारित मुदतीत चंद्रकांत सुर्यवंशी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.  त्यामुळे पिठासिन अधिकारी अमन मित्तल यांनी .चंद्रकांत सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

सुर्यवंशी यांच्या निवडीनंतर पिठासिन अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.  यानंतर महापौर निलोफर आजरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार, माजी महापौर सौ.सरिता देसाई, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनिल देसाई यांनी श्री.सुर्यवंशी यांचे निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

.चंद्रकांत सुर्यवंशी हे खंडोबा तालीम, शिवाजी पेठ च्या माध्यमातून कार्यरत आहेत. विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग आहे.  बलभीम बँक बचाव कृती समिती, टोलविरोधी कृती समिती, अशा आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग आहे.  गेल्या 40 वर्षांपासून लक्ष्मीपुरी आणि पांजरपोळ येथे त्यांचा गॅरेजचा व्यवसाय असून, ट्रक दुरुस्तीचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.  

या निवडीवेळी उप आयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त तथा अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे, नगरसचिव सुनिल बिद्रे, परिवहन सदस्य अशोक जाधव, सतिश लोळगे, यशवंत शिंदे, प्रसाद उगवे, संदीप सरनाईक, तसेच के.एम.टी.चे अधिकारी उपस्थित होते.

 संपादन - अर्चना बनगे

go to top