चंपा म्हणल्याने अजिबात राग येत नाही ; चंद्रकांत पाटील 

धनाजी सुर्वे 
Friday, 27 November 2020

अशा प्रकारची खालच्या पालळीवरील टीका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले

कोल्हापूर -  सध्या नेत्यांवर होणाऱ्या खालच्या पातळीच्या वकव्यांवरून राजकारण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमिवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा अपभ्रंश करून त्यांच्यावर टीका केली जाते परंतु, त्यामुळे आपल्याला अजिबात राज येत नाही असे आमदार पाटील यांनी सांगितले. एका वृत्तवाहिणीला मुलाखत देताना त्यांनी या विषयावर सर्वच पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारची खालच्या पालळीवरील टीका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. 

सोशल मीडियावरून नेत्यांवर खालच्या पातळीवरील टीका केली जाते यावरून आमदार पाटील म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणीच कोणारवर अशा खालच्या पातळीवरील टीका करू नये. माझ्या ज्या नावाने टिंगल उडविली जाती त्यावरून मला अजिबात राग येत नाही. मी एका गिरणी कारमगाराच कनखर मुलगा आहे. मी यावरजास्त विचार करत नाही. परंतु, अशा टीका करणे बरोबर नाही. आम्हाला पण अशी नावे पाडता येतात, परंतु ती आमची संस्कृती नाही. हा विषय गंभीर असून यावर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अभ्यास करून एकत्र यायला पाहिजे. याची सुरूवात कोठून झाली हे पण तपासले पाहिजे, असे मत आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. 

शिवसेनेला सोबत घेणार का?
   
भविष्यात शिवसेनेला सोबत घेणार का? यावर आमदार पाटील म्हणाले, राज्यात आमचा खूप चांगला संपर्क आहे. त्यामुळे आम्ही आमची ताकद आजमावणार असून स्वबळावर भाजपची सत्ता आणणार आहोत. शिवाय भविष्यात कोणाशी हात मिळवणी करायची यावर आमचे केंद्रिय नेतृत्व निर्णय घेते, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

हे पण वाचा - शरद पवारांवर माझा अभ्यास सुरू ; लवकरच पीएचडी करणार
 
यावेळी आमदार पाटील यांनी मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह काॅग्रेसरही कडक शब्दात टीकाही केली. 'तरूण कार्यकर्त्यांना काॅंग्रेस नेत्यांवर विश्वास नाही. सत्य जास्त दिवस लपून राहत नाही हे काॅंग्रेसने मान्य करावे आणि काॅंग्रेसला लोक टिकवून ठेवता येत नाहीत असा टोलाही पाटील यांनी लगावला. याबरोबरच सध्या राज्यात गाजत असलेल्या वीज बीलावरही पाटील यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, सरकामध्ये कोणत्याच कामावरून समन्वय नाही. एकाच विषयावर दोन मंत्री वेगवेगळे वक्तव्य करत असतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चांगली जाण आहे, हे सांगतानाच पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात टीका केली. उद्धव ठाकरे यांना मंत्रालय कुठं होत हे पण माहित नव्हतं, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना अभ्यास वाढविण्याची गरज असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil comment on champa viral statement