इचलकरंजीत दांपत्यावर खासगी सावकारीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

संशयित खोत यांच्या मालकीचे अमोल ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे.

इचलकरंजी - व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही गहाण ठेवलेल्या दागिन्यांसह धनादेश व मुद्रांक परत देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलिसांत खासगी सावकारीचा गुन्हा नोंद झाला. शहाजी पांडुरंग खोत आणि वैशाली शहाजी खोत (रा. डेक्कन सूतगिरणीसमोर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार पवन इरगोंडा पाटील (ईस्ट मॅंचेस्टर होम) यांनी दिली आहे. 

संशयित खोत यांच्या मालकीचे अमोल ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. त्यांच्याकडून तक्रारदार पाटील यांनी व्यवसायासाठी 65 हजार रुपये कर्ज घेतले होते. व्याजासह रकमेची परतफेड केली होती. कर्जापोटी खोत यांच्याकडे चार तोळे दागिने, यात चार सोन्याच्या अंगठ्या, चार सोन्याची कर्णफुले, एक सोन्याचे ब्रेसलेट, दोन कोरे धनादेश आणि 100 रुपयांचा कोरा मुद्रांक गहाण ठेवला होता. कर्जाची परतफेड केल्यावर दागिन्यांसह धनादेश व मुद्रांकाची मागणी पाटील यांनी खोत यांच्याकडे केली; पण खोत यांनी ते परत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पाटील यांनी दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली असून, जादा व्याजाची मागणी करून दागिन्यांची विल्हेवाट लावण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

हे पण वाचा  मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, ; खासदार संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

 

पोलिसांनी या प्रकरणी शहाजी खोत याला अटक केली असून, त्याला 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी दिली.

हे पण वाचा - तरूणाने नदीतील दगडी दीपमाळेवरून  पाण्यात उडी मारताच पोलीसांच्या उरात भरली धडकी

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: charged against couples to private lending case in Ichalkaranji